वि.मं. शिराळे प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद करपे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२७: तालुक्यातील वि.मं. शिराळे प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद करपे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. श्री करपे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विनोद करपे हे अरुळे गावचे सुपुत्र आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांची ३० वर्ष सेवा झाली आहे. देवगड व वैभववाडी तालुक्यातील प्राथमिक शाळांमधून त्यांनी सेवा बजावली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वैभववाडी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. श्री करपे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, ज्ञानी मी होणार तसेच जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या पुरस्काराचे वितरण हिंगोली येथे माजी खासदार सुधीर सावंत व शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करपे यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्यास वैभववाडी तालुक्यातील शिक्षक शुद्धोधन गजभिये, राजा गाडीकर, शिवराज करले, संजय साबळे, पांडुरंग भैराळे, सचिन कांबळे, श्री. खान, संतोष चामलवाड आदी उपस्थित होते. राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी मुकूंद शिनगारे, विस्तार अधिकारी निसार नदाफ, अशोक वडर, सर्व केंद्रप्रमुख तसेच अरुळे सरपंच उज्वल नारकर, सडूरे सरपंच संतोष पाटील व सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_