🛑 मोर्ले परिसरात बीएसएनएलची सेवा विस्कळीत ; ग्राहक त्रस्त
🛑 बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उत्कृष्ट सेवा द्यावी ; महादेव गवस , माजी सरपंच मोर्ले
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१०:– तालुक्यातील मोर्ले येथील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा मागील वर्षभरापासून वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे ग्राहक वैतागले आहेत. मोर्ले व परिसरातील अनेक मोबाइलधारकांनी बीएसएनएलची सेवा निवडली आहे.
परंतु वीजपुरवठा खंडित झाल्यास क्षणात रेंज गायब होते.त्याच बरोबर अचानक कॉल बंद पडत आहेत. तास-अर्ध्या तासापर्यंत रेंज मिळत नाही. इंटरनेट सेवाही कोलमडत आहे. गावातील 3G असलेल्या टॉवर 4G करण्यात आलेला आहे तरी अजूनही ग्राहकांना 3G इंटरनेटचा वापर करावा लागत आहे. सतत बंद पडत असलेल्या व धीम्या गतीने चालणाऱ्या इंटरनेटला ग्राहक कंटाळले आहेत त्यामुळे कंटाळून अनेक ग्राहकांनी इतर सुविधेचा लाभ घेतला आहे. परंतु आजही शेकडो ग्राहक बीएसएनएलच्या सेवेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत. उर्वरित कंपन्यांपेक्षा दर कमी असल्याने सर्वसामान्य मोबाइलधारकांना बीएसएनएलचा पर्याय सोयीस्कर वाटत आहे. भ्रमणध्वनी न लागणे, आवाज अस्पष्ट असणे, संभाषण पूर्ण होण्याआधीच संपर्क तुटणे, स्वत:चा आवाज स्वत:च्याच कानावर येणे आदी तक्रारी ग्राहकांमधून येत आहेत. इंटरनेट सेवेचीही हीच तक्रार आहे. इंटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याने याचा पोस्ट ऑफिस सेवेवर परिणाम होत असून ग्राहकांचे व्यवहार खोळंबत आहेत. अनेकदा व्यवहार बंद राहण्याची वेळ येत आहे. बीएसएनएल ऑफिसला केबल तुटणे, बॅटरी बॅकप उपकरणे नसणे ही कायमची कारणे आहेत. यामुळे वारंवार सेवा खंडित होते. मोर्ले परिसरात २४ तासातील १० तासही विनाखंडीत सेवा मिळत नाही. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उत्कृष्ट सेवा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
योग्य व तत्पर सेवा मिळत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक दुरावत आहेत. बीएसएनएलची मोबाइल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक वैतागले आहेत. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. – श्री महादेव गवस , माजी सरपंच मोर्ले तथा सेवाधारक.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

