सावंतवाडी शहरात आरटीओ कॅम्प करिता जागा उपलब्ध करून द्यावी; नगरसेवक ॲड. परिमल नाईक
▪️तालुक्यातील जनतेचा मानसिक,शारीरिक,आर्थिक त्रास दूर होण्यासाठी ॲड. नाईक यांची नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कडे मागणी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२५: कोविड-१९ प्रादुर्भाव कालावधीत नियमित मासिक आरटीओ कॅम्प हे सावंतवाडी शहरात सुरवातीला शासन निर्बंध असल्यामुळे आयोजित होऊ शकले नाहीत. परंतु आता तद्विषयी सर्व निर्बंध शासनाने उठविले असताना सुद्धा सोयीस्कर जागे अभावी सावंतवाडी शहरात आरटीओ कॅम्प आयोजित होऊ शकत नाहीत. पूर्वी ते शासकीय विश्रामग्रह येथे होत होते. परंतु सदर ठिकाणी आरोग्य खात्यामार्फत कोविड-१९ चाचणी केंद्र स्थापित केल्याने व पर्यायी जागा उपलब्ध होतं नसल्याने सावंतवाडी तालुक्यातील गरजवंताना नाहक वेंगुर्ले व दोडामार्ग येथे हजर राहण्याची सूचना आरटीओ कार्यालयातुन देण्यात येते. सदर बाब वेळ व पैसा या दोन्ही बाबींकरिता खर्चिक व त्रासदायक ठरत असल्यामुळे अँड. परिमल नाईक यांनी आरटीओ कार्यालयात विचारणा केली असता सावंतवाडी शहरात पर्यायी जागा उपलब्ध नाही असे कळविण्यात आले. वास्तूत: सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान किंवा अन्य सोयीस्कर ठिकाणी पर्यायी जागेची व्यवस्था सहजच होण्यासारखी असून तेथे सावंतवाडी नगरपरिषदेच्या अखत्यारीतील जागा व इमारत मासिक आरटीओ कॅम्प करिता उपलब्ध करून द्यावी व शहर व तालुक्यातील सामान्य जनतेला होणारा मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास दूर करावा अशी मागणी अँड. परिमल नाईक यांनी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. जयंत जावडेकर व नगराध्यक्ष श्री. सच्चीदानंद परब यांच्या कडे लेखी निवेदन देऊन केली आहे. सदर निवेदनाला प्रतिसाद देताना आरटीओ कार्यालय येथून मागणी पत्र प्राप्त झाल्यास सकरात्मक विचार करण्यात येईल असं मुख्याधिकारी श्री. जयंत जावडेकर यांनी संगितले.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_