🛑 कु. विराज नंदकिशोर राऊळ या विद्यार्थ्यांने संजू परब यांना दिली अनोखी भेट..
🛑 हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच पाहून संजू परब झाले बेहद्द खुश
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-३०:- मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याने स्वतः काढलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी महोत्सवाच्या उद्दघाटन प्रसंगी त्यांना देऊन अनोखी भेट दिली. कु विराज राऊळ या विद्यार्थ्याने आपली काढलेली हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच पाहून संजू परब बेहद्द खुश झाले. यावेळी उपस्थित माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यासह संजु परब व इतर मान्यवरांनी कु. विराज राऊळ याच्या या पेन्सिल पोर्ट्रेट स्केच कलेचे कौतुक करीत शाबासकीची थाप दिली.
कु विराज राऊळ याला पेन्सिल पोर्ट्रेट स्केचची आवड असून त्याने छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, यांच्यासह अनेकांची हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढून अनेकांची वाहवा मिळवली आहे. कु. विराज राऊळ याला सावंतवाडीतील अस्मसा आर्ट अकॅडमीचे सत्यम मल्हार आणि अक्षय सावंत तसेच मिलाग्रीस हायस्कूलचे कला शिक्षक गणेश डिचोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कु. विराज राऊळ याने शासकिय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेत ए ग्रेड पटकावली असून त्याने सप्टेंबर २०२४ मध्ये इंटरमिजिएट परीक्षा दिली आहे. तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये इयत्ता ८ वी साठी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ११ वा तर सावंतवाडी तालुक्यात ५ वा क्रमांक पटकावित शिष्यवृत्ती प्राप्त केली. कु. विराज राऊळ हा ओटवणे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा तर शिवसेनेचे माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर यांचा भाचा आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

