आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 देशाचा आदर्श नागरिक बनवण्याचे सामर्थ्य राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात आहे ; उद्योजक विवेकानंद नाईक

🛑 लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर खोक्रल येथे संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२९:– लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तालुक्यातील खोक्रल गावात संपन्न झाले. या शिबिरात विविध बौद्धिक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक २० डिसेंबर २०२४ रोजी विवेकानंद नाईक सदस्य महाविद्यालय विकास समिती तथा उद्योजक दोडामार्ग यांच्या हस्ते निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरीचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये उपस्थित होते.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सुरू झालेला राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम हजारो महाविद्यालयांमध्ये लाखो विद्यार्थी घडवत आहे. विद्यार्थी दशेतील संस्कार हे आयुष्यभर जीवनात उपयोगी पडतात. Not me but you म्हणजेच आम्ही स्वतःसाठी नसून समाजासाठी आहोत सेवेद्वारे शिक्षण हा एनएसएस चा मुख्य उद्देश आहे. या शिबिरात नेतृत्वगुणास संधी द्यावी श्रम संस्कारातून आरोग्य जपावे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे गावातील जलसंवर्धन व पर्यावरण याबाबत जाणीव निर्माण करावी ग्रामीण जीवनाच्या समस्या व उपाययोजना समजून घ्याव्यात आपापसात सामाजिक आणि नागरी जबाबदारीची भावना विकसित करावी. आजचा तरुण हा देशाचे भवितव्य आहे या करत्या लोकसंख्येत तरुणांचं स्थान अगदी महत्त्वपूर्ण आहे जगात भारत हा महासत्ता बनवण्यासाठी तरुणांची कार्यशक्ती देशाच्या विकासासाठी वापरल्यास जगात भारत देश महासत्ता बनेल यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुणांना योग्य आकार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाविद्यालयाने कराव प्रत्येक विद्यार्थ्यांनी या सर्व शैक्षणिक शिबिरातून आपल्या भावी जीवनाची संधी शोधण्याचा प्रयत्न करावा बदलते जग मागणीप्रमाणे पुरवठा केल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यामुळे दरडोई उत्पन्न वाढून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल लोकांचे सामाजिक जीवनमान उंचावेल पर्यायाने देश आर्थिक महासत्ता होईल असे त्यांनी म्हटले

अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष सन्माननीय अभिजीत

हेगशेटये यांनी दोडामार्ग तालुका डोंगराळ ग्रामीण भागात असल्यामुळे शिक्षणाच्या सोयीपासून तो वंचित होता अशा या ग्रामीण भागात शिक्षणाची सुरुवात नवनिर्माण शिक्षण संस्थेने करून इथल्या लोकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्यात सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तरी देखील आज महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट सारखा डिग्री कोर्स सुरू करून महाविद्यालयाने वेगळे पाऊल उचलले आहे इथल्या ग्रामीण तरुणांना गोव्यात तसेच परदेशात सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत अनेक विद्यार्थ्यांना गोव्यातील थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रोजगाराच्या संधी मिळाले आहेत तिथे काम करून सुद्धा ही मुले शिकताना दिसतात असे म्हटले.

व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय श्री. विवेकानंद नाईक, संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री. अभिजीत हेगशेटये, प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत ,खोक्रल गावचे सरपंच श्री. देवेंद्र शेटकर ,वेदांत वझरे कंपनीच्या सीएसआर हेड अधिकारी, उपसरपंच सौ .अंजू गवस ,कार्यक्रमाधिकारी डॉक्टर संजय खडपकर ,प्रा. भाग्यश्री गवस, प्रा.दर्शनी कोटकर प्रा.सेफाली गवस, प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी, ग्रामस्थ ,आजी-माजी विद्यार्थी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संजय खडपकर यांनी केले सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सानिया गवंडळकर तर आभार कुमारी तनया मणेरीकर हिने केले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!