कुडाळकृषिकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

शास्त्रज्ञ व कृषि विभागाने केली आंबा व काजू बागांची पाहणी

*🛑शास्त्रज्ञ व कृषि विभागाने केली आंबा व काजू बागांची पाहणी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २७:-* महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) योजनेअंतर्गत कुडाळ तालुक्यातील गांधीनगर गावातील आंबा व काजू बागांची पाहणी करताना प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील डॉ. गोपाळ गोळवणकर कीटकशास्त्रज्ञ व हॉर्टसॅप संशोधन सहयोगी, श्रीम. एस. एस. कविठकर कृषि पर्यवेक्षक, सोमकांत आईर कृषि सेवक यांच्यासह प्रगतशील आंबा व काजू शेतकरी उपस्थित होते.

सदर गावात एकूण २ आंबा बागांची पाहणी करताना कोणत्याही कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. आंबा बागा मोहोर अवस्थेत असून शेतकर्‍यांनी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के या कीटकनाशकाची ३ मिली/ली. पाणी याप्रमाणे फवारणी केल्याचे सांगितले. बागेत किडी-रोगाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे कीड-रोगाची आर्थिक नुकसान पातळी पाहूनच पहिलीच फवारणी असल्याचे त्यांनी नमूद केले, जे वाखणण्याजोगे असून ज्यामुळे त्यांनी कीटकनाशके, मजुरी यावर होणारा खर्च वाचविला. तर काजूच्या एकूण ४ बागांचे सर्वेक्षण केले असता बागा मोहोरलेल्या अवस्थेत असून ढेकण्या किडीसाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही याची १० मिली/ली याप्रमाणात फवारणी करण्यास सूचित केले. काजूच्या रोठा किडीसाठी प्राथमिक अवस्थेत करावयाच्या उपाययोजना करण्यास उद्युक्त केले.

शेतकऱ्यांनी त्यांच्या आंबा व काजू बागेत भेडसावणार्‍या समस्या विचारून त्यावर सखोल चर्चा केली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकर्‍यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली यांनी शिफारस केलेले आंबा व काजू मोहोर संरक्षण वेळापत्रक शेतकर्‍यांना वितरित करण्यात आले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!