कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उत्साहात उद्घाटन संपन्न

*🛑अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उत्साहात उद्घाटन संपन्न*

 

*🛑कोकणाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी विद्यार्थी परिषदेचा पुढाकार महत्त्वाचा – प्रा. मनीष जोशी*

 

*🛑कोकणाच्या सर्वांगीण विकासासोबत कोकण किनारपट्टीच्या सुरक्षितेसाठी राज्य सरकार कटिबद्ध – नितेश राणे*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोंकण प्रांताच्या 59 व्या कोंकण प्रांत अधिवेशनाचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगरी, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. मनिष जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे, अभाविप कोंकण प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, कोंकण प्रांत मंत्री राहुल राजोरिआ, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, अभाविप सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रा. साईनाथ सितावार, अभाविप सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटे मंचावर उपस्थित होते.

आपल्या उद्घाटकपर भाषणात प्रा. मनीष जोशी म्हणाले की आपल्या देशाच्या विकासासोबतच देशातील सर्व भागांचा विकास झाला पाहिजे आपल्या भागातील समस्यांचा विचार करून आपला भाग विकसित झाला पाहिजे यासाठी विद्यार्थी संघटना आग्रह धरते हे कौतुकास्पद आहे. कोकण रेल्वेच्या आंदोलनात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि आता कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते चालवत असलेली चळवळ हे खऱ्या अर्थाने अभिनंदनीय आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धरलेला आग्रह यामुळेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मातृभाषेत शिक्षण सुरू होत आहे.

विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते केवळ आजचा विचार न करता पुढील अनेक वर्षांमध्ये देशासमोरील संधी व आव्हाने यावर चिंतन करून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विमर्श तयार करण्याचे काम अभाविप करत आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे म्हणाले की, समृद्ध आणि विकसित कोकणासाठी कोकणातील विद्यार्थी विचारमंथन करत आहेत. कोकणाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी आपण पुढे आहात हे अभिनंदनीय आहे.

आपण सर्व राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत कार्यकर्ते आहात, यामुळे आपण ज्या भूमीतून येतो ती भूमी विकसित आणि सुरक्षित असावी यासाठी आपण सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी आग्रही असावे.

आपल्या अध्यक्षीय उद्बोधनात कोंकण प्रांत अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अनेक अडचणींवर मात करत अधिवेशनाचे यशस्वी आयोजन केले आहे.

स्वर्गीय सौंदर्य असणाऱ्या कोकणात शाश्वत विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी शासन यंत्रणेसोबत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे.

कोकण विकासाची सप्तसूत्री पर्यटन, प्रगत शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया उद्योग, वनशेती, वनऔषधी, मत्स्यव्यवसाय यांच्या माध्यमातून कोकणातील तरूणांसाठी कोकणात रोजगार निर्मिती करू शकतो.

प्रांत मंत्री राहुल राजोरिआ म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी कार्यकर्ता आपल्या कॅम्पस मध्ये कार्यक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करत असतो अश्या कार्यकर्त्यांसाठी अधिवेशन हा विद्यार्थ्यांचा सोहळा आहे.

आपल्या स्वागतपर भाषणात स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर म्हणाले की, मुंबई पासून गोव्यातील कोणकोण पर्यंत च्या राष्ट्रवादी विचारांवर आपल्या कॉलेज कॅम्पस मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत करतो.

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभाविप सावंतवाडी शहर मंत्री स्नेहा धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन अभाविप सावंतवाडी शहर अध्यक्ष प्रा. साईनाथ सीतावार यांनी केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!