केसरकर मित्रमंडळातर्फे सावंतवाडी महोत्सव
*🛑केसरकर मित्रमंडळातर्फे सावंतवाडी महोत्सव*
*🛑२९ डिसेंबर ते १ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २३:-* दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, रोटरी व रोटरॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावंतवाडी महोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे २९ डिसेबर २०२४ ते १ जानेवारी २०२५ दरम्यान जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, माजी नगरसेवक बाबू कुडतरकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, अर्चित पोकळे, सुरेंद्र बांदेकर, युवा सेनेचे प्रतीक बांदेकर तसेच
इनरव्हील क्लबच्या डॉ. सुमेधा नाईक-धुरी, रिया रेडीज, देवता हावळ, सायली होडावडेकर, शर्वरी धारगळकर आदी उपस्थित होते.
या महोत्सवात लोककला, संगीत, स्थानिक मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध वस्तुंना बाजारपेठ मिळवून देणारे स्टॉल तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत. २९ डिसेंबरला कुडाळ- मालवणचे आमदार नीलेश राणे तसेच माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. रात्री ‘साज-द-संगीत हा कार्यक्रम होणार आहे. याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम धनश्री कोरगावकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. तसेच ३० डिसेंबरला ६ वाजल्यापासून ‘ब्युटी कॉन्टेस्ट ‘मिस सावंतवाडी’ ही स्पर्धा होणार आहे. ३१ डिसेंबरला आवाज आर्ट इव्हेंट निर्मित ‘बेधुंद २०२५’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याला सुप्रसिद्ध वादक शैलेश पाटोळे उपस्थित राहणार आहे इडियन आयडॉल फेम राहुल खरे, ‘सूर नवा ध्यास नवा महाविजेती सन्मिता चापटे-शिंदे, सारेगम मराठी फेम ब्रम्हानंदा पाटणकर, गोवा आयडॉल समृद्ध चोडणकर यासह झी मराठी ड्रामा ज्युनिअर फेम कलाकार मनमोहक कला सादर करणार आहेत. तसेच २० जणाचे समूहनृत्य सादर होणार आहे. १ जानेवारी २०२५ ला रात्री ८ वाजता श्री संगीत सद्गुरू सांस्कृतिक मंडळाचा सुश्राव्य संगीत कार्यक्रमाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. दरम्यान, खवय्यांसाठी विविध प्रकारचे फूड स्टॉल्सदेखील लावण्यात येणार आहेत. यासाठी अर्चित पोकळे (९७६७१५०७९०), डॉ. सुमेधा धुरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

