सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
*🛑सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा वार्षिक स्नेह मेळावा उत्साहात संपन्न*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २१:-* माझे आपले व आपले एक वेगळे नाते निर्माण झाले आहे आपली कोणतीही समस्या असेल तर मला भेटा मी आपल्या समस्यांचे निश्चित निरसन करेल अशी ग्वाही पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी कसाल येथे सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वार्षिक स्नेह मेळावे प्रसंगी बोलताना मार्गदर्शन केले.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या वतीने साई बँक्वेट हॉल बालमवाडी कसाल येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांचा वार्षिक स्नेहमेळावा संपन्न झाला .मेळाव्याला प्रमुख मान्यवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते . जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी कल्याणकारी असोसिएशन यांच्या वतीने पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित सदस्यानी आपल्या काही समस्या व्यक्त केल्या असता त्यांचे योग्य प्रकारे अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. वर्षभरातील दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष व माजी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की संघटनेच्या माध्यमातून अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.आरोग्य शिबीर, रक्तगट शिबिर, गेट टुगेदर, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण, अष्टविनायक दर्शन सहल, कॅलेंडर छपाई अशी विविध कामे हाती घेण्यात आलेली आहेत. पुढील वाटचालीसाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह सुरेंद्र सकपाळ यांनी केले तर आभार उपाध्यक्ष गोविंद उर्फ दाजी वारंग यांनी मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

