कणकवलीतील कॅन्सरग्रस्त महिलेला हवा मदतीचा हात..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२३: कमावणारे सर्वच हात बंद, त्यातच नुकतेच झालेले ऑपरेशन, व गतिमंद मुलीची असलेली जबाबदारी, अशा समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या कणकवली शहरातील गांगोवाडी येथील शिल्पा गणेश गावडे या कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक मदतीचा हात हवा आहे. शिल्पा यांच्यावर नुकतीच चिपळुण-डेरवण येथे शस्त्रक्रिया झाली असुन, घरकाम करून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. मात्र याच काळात त्यांचा पती गणेश गावडे यांना रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे औषधोपचारांचा खर्चही करणे शिल्पा गावडे यांना आता कठीण बनले आहे. शिल्पा यांना बारा वर्षाची एक मुलगी असुन, ती देखील गतिमंद आहे. घरात कमवते कुणीच नसल्याने शिल्पा यांच्यासमोर सध्या समस्यांचा डोंगर उभा आहे. एकीकडे ऑपरेशन होऊन औषध उपचारांचाही खर्च भागवता येत नाही. त्यात मुलीकडे लक्ष देणे शक्य होत नाही. व त्यात नवरा रुग्णालयात असल्याने पुढे करायचे काय असा प्रश्न शिल्पा गावडे यांच्या समोर उभा ठाकला आहे. त्यामुळे अशा अडचणीत सापडलेल्या या कुटुंबीयांना समाजातील दानशूर व्यक्ती स्वयंसेवी संस्था यांनी मदत द्यावी असे आवाहन कणकवली गांगोवाडी येथील नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी केले आहे. शिल्पा यांचा बँक खाते नंबर व आय एफ एस सी कोड पुढीलप्रमाणे आहे.
Ifsc code- SBIN0000282
स्टेट बँक खाते क्रमांक- 32808868533
शिल्पा गणेश गावडे, मोबाईल- 9420735895
वरीलप्रमाणे माहिती असून या बँक खात्यावर आर्थिक स्वरूपाची मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

