मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा २५ रोजी वार्षिक जत्रोत्सव

*🛑मळगाव येथील दोन पूर्वस देवाचा २५ रोजी वार्षिक जत्रोत्सव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १७:-* मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २५ डिसेंबर२०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

सोनुर्ली येथील श्री देवी माऊली प्रमाणे दोन पूर्वस हे सोनुर्ली आणि मळगाव या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवाला मळगाव पंचायतनची तरंगकाठी व पालखी सोनुर्ली येथे श्री देवी माऊलीच्या भेटीसाठी जाते. तर दोन पूर्व देवाच्या जत्रोत्सवादिवशी श्री देवी माऊली पंचायतन देवांच्या भेटीसाठी मळगाव येथे येते. श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवादिवशी काही कारणास्तव कोणाची माऊलीची ओटी भरणे राहीले असेल तर दोन पूर्वस जत्रोत्सवादिवशी श्री देवी माऊलीची ओटी भरून नवसफेड केली जाते. अशा या दोन गावचे दैवत असलेल्या श्री देव दोन पूर्वस देवाचा जत्रोत्सव २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी श्री देवी माऊलीचे वाजगाजत आगमन, त्यानंतर श्री देवी माऊलीची ओटी भरणे, दोन पूर्वस देवाला केळी नारळ ठेवणे, आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री मंदिराभोवती भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर खानोलकर दशावतार मंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव व सोनुर्ली देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!