मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला
*🛑मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला*
*🛑गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीमय वातावरण*
*🛑तरंगकाठीचे घरोघरी पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत पूजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- १६:-* मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून घरी आलेल्या तरंगकाठीचे प्रत्येक घरोघरी पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत व भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे.
मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा सोनुर्ली माऊली जत्रोत्सव पार पडल्यानंतर मळगाव गावात पंचायतन देवस्थानची तरंगकाठी घरोघरी फिरविण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आली आहे. तत्पूर्वी ही तरंगकाठी मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने मळगाव येथील रवळनाथ जत्रोत्सव झाल्यावर सोनुर्ली जत्रोत्सवासाठी नेली जाते. तरंगकाठी व पालखी जत्रोत्सवानंतर सोनुर्ली येथे पाहुणचारासाठी थांबते. तेथे पाहुणचार झाल्यावर पाच दिवसांनी मळगाव गावात आल्यावर तरंगकाठी मळगावात घरोघरी फिरविली जाते. यावेळी गावातील गोसावी मठालाही भेट देण्यात येते. यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कुळघराकडून विधिवत तरंगकाठी व पालखीचे पूजन झाल्यावर ढोलांच्या गजरात मानकऱ्यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी सावंत यांच्या घरापासून तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पाडगावकर, जोशी आदी मानकऱ्यांजवळ तरंगकाठी फिरवून गावातील गोसावी मठाला भेट देण्यात आली. त्यानंतर बाकी गावात तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी घरातील व्यक्तींनी तरंगकाठीचे विधीवत पूजन केले. तसेच देवीची ओटी भरण्यात आली. यावेळी नवस केलेल्या सुवासिनींनी तसेच नवीन लग्न झालेल्या महिलांनी देवीस साडी अर्पण करुन नवसफेड केली. या सोहळ्यात मोठ्यांसह लहान मुलेही सहभागी झाली होती. असंख्य वर्षांची ही परंपरा मळगाव गाव एकोप्याने जपत आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

