गोवंश हत्या थांबविण्यासाठी कठोर नियम, कायदे करा !
*🛑गोवंश हत्या थांबविण्यासाठी कठोर नियम, कायदे करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १६:-* गोवंश हत्या थांबविण्यासाठी कठोर नियम, कायदे व उपाययोजनेची मागणी सावडाव येथील नयना सावंत यांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी राणेंना रजिस्टर एडीने निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, गावागावांमध्ये गोरक्ष समितीची नेमणूक करावी. प्रत्येक गावातील गुरांची नोंद गाव पातळीवर करावी. गाईने वासरास जन्म दिल्यास त्याचीही नोंद करावी. गावातील गुरांचा मृत्यू झाल्यास त्याचा पशुवैद्यकीय अधिकारी वा गोरक्ष कमिटी यांनी पंचनामा करून त्याची नोंद करावी. गावात कोणालाही गुरे विकायची असल्यास ज्या गावातील खरेदीदारास गुरे विकली जाणार आहेत त्या गावाच्या गोरक्षक कमिटीशी संपर्क साधून ती कत्तलीसाठी जाणार नाहीत? याची योग्य ती खातरजमा करूनच गोरक्ष समितीने गुरे विकण्यास परवानगी द्यावी वा यावर शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात. गावातील भाकड गुरे शेतकऱ्यांना सांभाळण्यास जमत नसेल तर शासनातर्फे गोवंश आश्रमाकडे सोपविण्यात यावी. गुरांची राखण न करता त्यांना निष्काळजीपणे महामार्ग वा इतर रस्त्यांवर मोकाट सोडल्यास कठोर नियम करून गुरांची रवानगी सक्तीने गोवंश आश्रमात करून गुरांच्या मालकांवर जाणीवपूर्वक गुरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने कायदेशीर कारवाई करावी. जप्त केलेली जनावरे इतर गरजू शेतकऱ्यांना मोफत देण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
