मालवणात जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा निवड चाचणी
*🛑मालवणात जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा निवड चाचणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १६:-* सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनतर्फे घेण्यात येणारी कुमार, कुमारी जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मालवण तालुका कबड्डी असोसिएशन आणि जय गणेश, मालवण व रेवतळे महापुरुष कबड्डी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २० डिसेबर रोजी दुपारी २ वाजता येथील चिवला बीच, सेवांगण येथे आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा दोन मैदानात सलग खेळविली जाणार असून खेळाडू रजिस्ट्रेशन, वजन कागदपत्रांची पुर्तता इत्यादी बाबी तपासणी दुपारी १ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या संघांनी आपले संघ स्पर्धेच्या दिवशी दुपारी १ पर्यंत हजर ठेवणे बंधनकारक आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केली जाणार असून विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेतून निवडलेले कुमार, कुमारी गटाचे संघ पुणे येथे होणाऱ्या ५१ व्या कुमार, कुमारी गट राज्य अजिक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. यात २० वर्षाखालील कुमार, कुमारी गटासाठी जन्म तारीख- १ जानेवारी २००५ व कुमार गटासाठी वजन ७० किलो, कुमारी गटासाठी वजन ६५ किलो कुमार, कुमारी गट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी वयाच्या दाखल्याबाबत पुरावा म्हणून दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या खेळाडूंनी परीक्षा हॉल तिकिटाची रंगीत छायांकित प्रत द्यावी. यावर्षी दहावी व बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षा अर्ज भरल्यानंतर प्री लिस्टची प्रत मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनिशी द्यावी माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी खेळाडूंसाठी शाळेचा यू-डायस नंबर व स्टुडन्ट आयडी असलेल्या बोनाफाईड व निर्गम उताऱ्यावर खेळाडूच्या फोटोवर मुख्याध्यापकानी अर्धसाक्षांकित केलेले असावे पहिली प्रवेश घेतल्याचा निर्गम उतारा. आरटीई २००९ प्रमाणे प्रवेश घेतला असल्यास प्रथम प्रवेश घेतलेल्या शाळेचा यू-डायस व स्टुडन्ट आयडी असलेला निर्गम उतारा किंवा टीसीची छायांकित प्रत संबधित खेळाडूचे वय एक वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला संबंधित खेळाडूचे वय ५ वर्षापर्यंत असताना संबंधित शासकीय विभागाने वितरित केलेला जन्मदाखला. संबंधित खेळाडूच्या वयाची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शासकीय विभागाचा जन्मदाखला असेल, तर खेळाडूच्या पहिल्या इयत्तेतील प्रवेश घेतलेल्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत अनिवार्य राहील. यापैकी एका जन्मपुराव्यासोबत आधारकार्डची रंगीत छायांकित प्रत व मूळ प्रत किंवा पासपोर्ट रंगीत छायांकीत प्रत व मूळ प्रत सोबत आणावी.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

