घाटिवडेत पुन्हा टस्करचे आगमन
*🛑घाटिवडेत पुन्हा टस्करचे आगमन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १६:-* : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर चंदगड तालुक्यात ठाण मांडलेल्या वन्य हत्तींनी पुन्हा एकदा दोडामार्ग तिलारी खोऱ्यात आपला मोर्चा वळविला आहे. कळपातील भल्या मोठ्या टस्कर हत्तीचे शुक्रवारी मध्यरात्री विजघर घाटिवडे येथे आगमन झाले. त्यानंतर तेथील चार ते पाच शेतकऱ्यांच्या नारळ- सुपारी केळी बागायतीच नुकसान केले आहे. बऱ्याच कालावधीनंतर हत्ती परतून नुकसानी सुरू झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत पडले आहेत. टस्कर हत्ती दाखल झाल्याचे समजताच वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तेथील पाहणी केल्याचे समजते आहे. शिवाय पंचनामाही केला आहे. तर हत्ती परतल्याने शेतकरी बांधवांनी रात्रीच्या वेळी वनविभागाने वनाधिकारी यांच गस्ती पथक तैनात करावे, अशी मागणी केली. गेल्या काही महिन्यापासून दोडामार्ग तालुक्यातील टस्कर व अन्य हत्ती यांचा वावर चंदगड तालुक्यात होता. गेल्या आठवड्यात तो तिलारीनर कळसगादे मुख्य रस्त्याशेजारी आढळून आला होता. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आता तर हा टस्कर थेट चंदगडहुन गेल कंपनीने तयार केलेल्या रस्ता मार्गे घाटिवडे विजघर येथे माघारी परतला आहे. शुक्रवारी मध्यरात्री टस्करने घाटिवडे विजघर येथे नुकसानी केली आहे. त्यामुळे शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

