तटबंदी दुरुस्तीसह सिंधुदुर्ग किल्ला रोषणाईने उजळणार!
*🛑तटबंदी दुरुस्तीसह सिंधुदुर्ग किल्ला रोषणाईने उजळणार!*
*🛑खासदार नारायण राणे यांच्या निवेदनानंतर पर्यटनमंत्र्यांचे आश्वासन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १२:-* केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा मानबिंदू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीची पडझड थांबविण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई करण्याबाबत आग्रही भूमिका खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. केंद्रीय सांस्कृतिक अन् पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेत श्री. राणे यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या वास्तव स्थितीचे अन ऐतिहासिक दस्तावेजाच्या अमूल्य ठेव्याकडे लक्ष वेधले. यावेळी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना करण्याबाबत पर्यटनमंत्र्यांनी आश्वासित केले.
यावेळी खासदार राणे यांनी पर्यटनमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणांचा ऐतिहासिक ठेवा जपणाऱ्या अरबी समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याबाबत निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, या ऐतिहासिक किल्ल्याला दरवर्षी पाच ते सहा लाख पर्यटक भेट देतात. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी प्रत्यक्ष किल्ल्याला भेट दिली होती. त्यांना समर्पित या किल्ल्यावर मंदिर असून गडाच्या तटबंदीनजीक छत्रपतींचा हात अन पायाचा ठसाही जतन केला गेला आहे. दुर्दैवाने, आज हा किल्ला अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. किल्ल्याच्या तटबंदीला संरक्षित करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबरोबरच किल्ल्यावर रोषणाई केल्यास पर्यटकांची संख्या येथे वाढेल. पुढील पडझड थांबवण्यासाठी ठेट्रा पॉडस् समुद्रात फोर्डच्या आसपास ठेवणे आवश्यक आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

