सावंतवाडी रुग्णालयासाठी दहा स्टँड फॅन भेट
*🛑सावंतवाडी रुग्णालयासाठी दहा स्टँड फॅन भेट*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व अन्य दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासाठी दहा स्टॅन्ड फॅन भेट देण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग गुरुवारपासून प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. या अतिदक्षता विभागात सेंट्रल एसी बसविले आहेत. परंतु लाईट गेल्यास एसी बंद होणे किंवा बिघडणे असे प्रकार घडल्यास तेथील उपचार घेणाऱ्या रुग्णांना शारीरिक व मानसिक त्रास होऊ नये, यासाठी मसुरकर यांना स्टैंड फॅन बसवण्याची कल्पना सुचली. शासनाकडून होणाऱ्या प्रक्रियेला होणारा विलंब लक्षात घेऊन मसुरकर यांनी दानशूर व्यक्तिमत्व आणि भालेकर खानावळीचे मालक राजू भालेकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी प्रफुल्लचंद्र सांगोडकर व गोरगरिबांच्या रुग्णांना मदतीसाठी धावणारे सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव व त्यांची सहकारी टीम, सुधीर उर्फ स्वामी नारायण पोकळे यांच्या मदतीतून मसुरकर यांनी ३० हजार रुपये किमतीचे दहा स्टॅन्ड फॅन खरेदी करून ते उपजिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला दिले.
मसुरकर हे आपला व्यवसाय सांभाळून दिवसातून दोन- तीनवेळा रुग्णालयाला भेट देतात. गंभीर किंवा अतिगंभीर रुग्णांना मदतीचा हात देतात. रुग्णालयातील समस्यांसंदर्भात आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा करतात. प्रसंगी पदरमोड करत सुविधा उपलब्ध करतात. त्यांना सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी, दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळते. यापूर्वीही त्यांनी मदत केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

