देवगडात २९ रोजी ‘देवगड रन’ स्पर्धा
*🛑देवगडात २९ रोजी ‘देवगड रन’ स्पर्धा*
*🛑गौरव पारकर, डॉ. किरण पाटणकर यांची माहिती: पर्यटनाच्या चालना देण्यासाठी आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- ०९:-* रोटरी क्लब ऑफ मैगोसिटी देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने २९ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता ‘देवगड रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पाच कि. मी. आणि दहा कि. मी. अशा दोन गटात होणार आहे. देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दौड आरोग्याची साद देवगडच्या पर्यटनाची’ या घोषवाक्याला अनुसरुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीचे सचिव गौरव पारकर व डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे सदस्य डॉ. किरण पाटणकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील हॉटेल डायमंड येथे आयोजित पत्रकार परिषदेत गौरव पारकर व डॉ. पाटणकर यांनी ‘देवगड रन या स्पर्धेची रुपरेषा जाहीर केली. यावेळी रोटरी क्लबच्या सदस्या अनुश्री पारकर, अनिल गांधी, दयानंद पाटील, नरेश डामरी, मनीषा डामरी, अनिकेत बांदिवडेकर, श्रीपाद पारकर आदी उपस्थित होते. ही स्पर्धा हॉटेल डायमंड येवून सुरू होईल व तारामुंबरी बीच येवून पुन्हा हॉटेल डायमंड अशा अंतरावर पार पडेल. स्पर्धेतील ५ कि मी साठी १०० रु. तर १० कि. मी. साठी १५० रुपयांचे नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे प्रत्येक सहभागी स्पर्यकाला टी-शर्ट दिला जाईल तसेच स्पर्या पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांना पदक देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या स्पर्धकांनी ऑनलाईन २२ फॉर्म डिसेंबरपर्यंत भरण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे. https://forms. gle/61EHYqdzNtKjxHRK9 या लिंकवर फॉर्म भरून स्पर्धकांनी आपली नावनोंदणी निश्चित करावयाची आहे. देवगडच्या पर्यटनवृद्धीस हातभार लावण्यासाठी स्पर्धकांनी बहुसंख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

