🛑 अखेर “त्या” टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०८:- झरेबांबर तिठा येथे दोडामार्ग ते बेळगाव मार्गावर शुक्रवारी दुपारी आपल्या आईसोबत झरेबांबर ओलांडत असताना मांगेली देऊळवाडी येथील कु.श्रिया संदीप गवस (वय -७) हिचा दुदैवी मृत्यू झाला. या नंतर नागरिक संतप्त झाले होते. टेम्पो मालक येत नाही तोपर्यंत सोडणार नाही असा पवित्रा घेतला होता साडेसहा तास पोलिसांना रोखले होते. या अपघात प्रकरणी मयत हिचे काका सुनिल राजाराम गवस यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार टेम्पो चालक सुरेश पुंडलिक पवार वय वर्षे २० रा. तिलारीनगर ता. चंदगड याच्यावर मृत्यूस कारणीभूत वाहन नुकसान प्रकरणी चालक याला ताब्यात घेऊन राजी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती दोडामार्ग पोलीस ठाण्यात निसर्ग ओतारी यांनी दिली.
शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्वरूपा संदीप गवस ही आपली मुलगी श्रीया संदीप गवस झरेबांबर येथे आली होती. ती पुन्हा मांगेली देऊळवाडी येथे जाण्यासाठी झरेबांबर तिठा येथे रस्ता पार करताना भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोची धडक बसून चाक डोक्यावरून गेले यामुळे दोडामार्ग रुग्ण मृत्यू झाला होता. या नागरिक संतप्त झाले होते. पोलीस बांधकाम विभाग याना धारेवर धरले होते. झरेबांबर तिठा अपघात प्रकरणी टेम्पो चालवते असलेल्या सुरेश पवार वर दोडामार्ग पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 136/2024 भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281, 125 (a),125(b), 324(4) (5), mv act 184 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. असे पोलिसांनी सांगितले.दिलेल्या फिर्यादीत झरेबांबर तिठा येते फिर्यादी यांची भावजय सौ स्वरूपा व पुतणी श्रेया संदीप गवस वय 7 वर्ष या मांगेले येथे जाण्यासाठी बस स्टॉप वर थांबल्या असता टाटा 407 टेम्पो नंबर एम एच 09 सी यु 7949 वरील चालक सुरेश पुंडलिक पवार वय 20 वर्ष राहणार तिलानीनगर तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर याने रस्त्याचे विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने अविचाराने भरदाव वेगाने टेम्पोचा चालवुन फिर्यादी यांची पुतणी श्रीया हिला धडक देऊन तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचे मृत्यूस तसेच टेम्पोचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सुरू आहे. असे सांगितले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

