आवडीच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करा कळसुलकर हायस्कूलमध्ये सावंतवाडी गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक यांचे प्रतिपादन
*🛑आवडीच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करा कळसुलकर हायस्कूलमध्ये सावंतवाडी गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक यांचे प्रतिपादन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* सावंतवाडी शहरातील जुनी व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ( बीडीओ) श्री वासुदेव नाईक बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करून शाळेचे व संस्थेचे नाव जगभरात पोहोचविण्याचे काम करावे.
याप्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच अध्यक्षीय भाषणातून शाळा मोठी झाली की आपोआप संस्था मोठी होत असते, त्याचबरोबर संस्थेकडून लागणारे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे याप्रसंगी सांगितले. संस्थेमधील ठेवीच्या व्याजाच्या रकमेतून इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, श्रीमती जी.एस.सावंत, श्रीमती एस.जी.सामंत,स्वागत गीत मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती एस.एस.चव्हाण, ज्युनियर कॉलेजचे प्रमुख श्री उत्तम पाटील,पालक श्रीमती विचारे व्यासपीठावर उपस्थित होते. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे वाचन प्रशालेतील शिक्षिका श्रीमती एस यु बांदेलकर व श्री ए.जे.ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल ठाकूर तर आभार श्रीमती एम.एम.कदम यांनी मानले.शेवटी वंदेमातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

