इन्सुली राज्य उत्पादन शुल्काचे (दारुबंदी विभाग)अधिकारी हप्ते वाढवून घेण्यात व्यस्त
*🛑इन्सुली राज्य उत्पादन शुल्काचे (दारुबंदी विभाग)अधिकारी हप्ते वाढवून घेण्यात व्यस्त*
*🛑एका दारुमाफीया कडून महिन्याला चाळीस हजार हप्ता कोट्यावधीची उलाढाल*
*एक्साईज खात्याच्या अधिकाऱ्याच्या घरातून निघतो सोन्याचा धूर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* राज्य उत्पादन शुल्क (दारुबंदी विभाग इन्सुली) हे नामधारी खाते बनले असून गोव्यातून महाराष्ट्रात दिवसाकाठी कोट्यावधी रुपयांची अवैध दारू जात असताना इन्सुली सीमेवरील तपासणी नाके फक्त हप्ता वाढवून घेण्यात व्यस्त असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.महिन्याला एक केस द्या नाहीतर 25000 चा हप्ता ४०,००० करून द्या अशी मागणी संबंधित अधिकारी करू लागले आहेत,त्यामुळे या अधिकाऱ्यांची महिन्याची कमाई ही कोटीच्या घरात जाते म्हणून अशा अधिकाऱ्यांच्या संपत्तीची इडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या माध्यमातून यावर वारंवार प्रकाश झोत टाकूनही गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी हप्ते खाऊन सुस्त पडलेले आहेत,तक्रारी, बातम्या आल्यात की या अधिकाऱ्यांचा अधिक फायदा होतो आम्हाला वरून दबाव आहे असे सांगून हप्ता वाढून घेऊन अधिक ची मलिदा खायला त्या अधिकाऱ्यांना मिळते म्हणून अशा अधिकाऱ्यांची खात्याने चौकशी करून त्यांच्या संपत्तीचीही चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
गोव्यात डुप्लिकेट दारू बनविण्याचे काही ठिकाणी कारखाने आहेत,ती दारू सिंधुदुर्ग व महाराष्ट्रात सरासपणे विकली जाते ,महाराष्ट्राच्या दारूपेक्षा गोवा बनावटी दारु स्वस्त मिळत असल्याने मद्यपिंची या दारूला अधिक पसंती असते व त्यांना किक ही लवकर येते,त्यामुळे गोव्यातील दोन नंबरची दारू पिण्यात त्यांना वेगळी मजा येते,मात्र ही दारु नेहमी पिणारे वर्षभरातच आपले तिकीट बुक करतात कारन या दारुत अल्कोहोल चे प्रमाण शासन नियमाच्या पन्नास पट अधिक असते,त्यामुळे गोवा राज्याने अशा प्रकारे डुप्लिकेट दारु बनविणारे कारखाने उध्वस्त करावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
माजी मुख्यमंत्री कै.मनोहर पर्रीकर यांच्या काळात गोव्यातील डुप्लिकेट दारू बनविणारे कारखाने उध्वस्त करण्यात आले होते,तशी कारवाई अलीकडच्या काळात केली गेली नाही त्यामुळे गोव्यातून महाराष्ट्रात गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात सप्लाय होऊ लागली आहे व याच दारुच्या अमाप पैशावर संघटित गुन्हेगारी निर्माण झाली आहे या सर्वांचे मूळ राज्य उत्पादन शुल्क विभाग असून यांचे अधिकारी कोणतेही कारवाई न करता फक्त हप्ते वाढवून घेण्यातच गुंतले आहेत.
कागदपत्रे महिन्याला एका दुसरी केस दाखवायची व ती केस मागून घ्यायची असा नेहमीचाच फंडा झाला आहे, त्यामुळे यांच्यावर दंडा बसल्याशिवाय राज्य उत्पादन शुल्काचे दारुबंदी विभागाचे अधिकारी वठणीवर येणार नाहीत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

