मातोंड-पेंडूरचा प्रसिद्ध घोडेमुख जत्रोत्सव आज
*🛑मातोंड-पेंडूरचा प्रसिद्ध घोडेमुख जत्रोत्सव आज*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि- ०६:-* मातोड-पेडुर येथील स्वयंभू व जागृत देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री देव घोडेमुख देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव ६ डिसेंबर रोजी होणार आहे ही जत्रा ‘कोंब्याची जत्रा’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. यानिमित्त सकाळपासून केळी ठेवणे, नवस फेडणे, नवस बोलणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या शिवमार्तंडेश्वराचे हे वस्तीस्थान आहे. ३६० चाळ्यांचा अधिपती, भूत पिशाच्चगण यांचा नायक म्हणून त्याचा येथे वास असतो, अशी ग्रामस्थांची दृढ श्रद्धा आहे. विशेष म्हणजे नवसाला पावणारा म्हणून या देवस्थानची ख्याती सर्वदूर आहे. शरीराच्या कुठल्याही अवयवाचं दुखणं असेल, तर येथे नवस बोलला जातो. हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते. देशभरातून भाविक या देवाच्या चरणी नवस बोलण्यासाठी येतात. देवदीपावली दिवशी मातोंड येथील ग्रामदैवत सातेरी मंदिरात मांजरी बसते. त्यानंतर सलग तीन दिवस या मंदिरात जागर होतात. चौथ्या किंवा पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुख जत्रोत्सवादिवशी गावकर मंडळी व इतर मानकरी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी, भूतनाथ व पावणाई या तरंग काठ्यांसह घोडेमुख मंदिराकडे मार्गस्थ होतात. घोडेमुख मंदिरात आल्यानंतर मेळेकरी, भूतनाथ व पावणाई या देवतांना उपार केल्यानंतर गावकर व इतर मानकऱ्यांसह गावचा कोंब्याचा मान चाळ्यांना दिला जातो विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास मेळेकरी, भूतनाथ व पावणाई अवसारासह खाली येतात व सातेरी मंदिराकडे मार्गस्थ होतात. त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होते. या जत्रोत्सवासाठी गोवा, मुंबई, बेळगाव आदी भागातून भाविक येतात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, पोलिसांनी बंदोबस्ताबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी, मातोंड व मातोंड-पेंडुर येथील ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

