गुळदुवे ज्ञानदीप वाचनालयास मांद्रे (गोवा) येथील साहित्य संगमच्या सदस्यांची भेट:कामकाजाबद्धल केलं कौतुक
*🛑गुळदुवे ज्ञानदीप वाचनालयास मांद्रे (गोवा) येथील साहित्य संगमच्या सदस्यांची भेट:कामकाजाबद्धल केलं कौतुक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴मांद्रे, दि- ०३:-* येथील अखंडित ४१४ व्या मासिक कार्यक्रमांतर्गत ‘ साहित्य संगमच्या ‘मंडळाच्या सदस्यांनी गुळदुवे येथील ज्ञानदीप वाचनालयास भेट देऊन वाचनालयाच्या कार्यकारिणी सदस्यांशी वार्तालाप केला व वाचनालयातील ग्रंथ पाहणी केली. सिधुदुर्गातील गुरुवर्य वि .स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान संचलित रेडी या ठिकाणच्या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्यावर श्रीपाद गणपत पेंडसे यांनी १९९३ साली गुळदुवे या सहाशे लोकवस्ती असलेल्या या आपल्या छोट्याशा गावात वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या ज्ञानदीप वाचनालयात आज घडीला ७५०० पुस्तके असून सात वर्तमानपत्रे व दहा नियतकालिके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. या वाचनालयाचे ६० आजीव सदस्य असून १०५ सर्वसाधारण सदस्य आहेत अशी माहिती वाचनालयाचे कार्यवाह तथा आरोंदा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री अरुण धर्णे यांनी दिली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी साहित्य संगम चे जेष्ठ सदस्य मुख्याध्यापक दिलीप मेथर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर कार्यवाह गजानन मांजरेकर यांनी साहित्य संगम च्या ३४ वर्षाच्या अखंडित वाटचालीविषयी माहिती दिली. ज्येष्ठ सदस्य विष्णुबुवा शेटगांवकर यांनी साहित्य संगम च्या सदस्यांचा तर अरुण धर्णे यांनी ज्ञानदीप वाचनालयाच्या कार्यकारिणीच्या सदस्यांचा परिचय करून दिला .वाचनालयाचे अध्यक्ष फटू धर्णे, खजिनदार ज्योती पेंडसे, उपाध्यक्ष मोहन कारेकर ,सहकार्यवाह प्रशांत खोबरेकर, सदस्य तथा गावचे माजी सरपंच रुपेश धर्णे , संतोष सावंत, ग्रंथपाल नंदकिशोर धर्णे , केशरीनाथ केदार यांनी साहित्य संगम च्या सदस्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. साहित्य संगमच्या वतीने प्रगती परब यांनी तर वाचनालयाच्या वतीने अरुण धर्णे यांनी ऋणनिर्देश केले .हरी शेटगांवकर, महेंद्र परब ,रश्मी तारी, संध्या आरोलकर ,शंकर शेटगांवकर, शरद गावडे, अर्चना परब, नेहा वेंजी, निरंजन मांद्रेकर ,प्रभाकर गावकर, अजित शेटगांवकर हे साहित्य संगम चे सदस्य तसेच आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा मालवणी भाषेतील सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर ,निवृत्त शिक्षक विनायक उमर्ये वाचनालयाचे ग्रंथसेवक अनिल जोशी हे साहित्य संगमच्या वार्षिक ग्रंथालय भेट कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी श्री विष्णूबुवा शेटगांवकर यांनी छोटीशी शब्द रूपी कविता करून उपस्थितांमध्ये एक उत्साह निर्माण केला.ग्रंथालय भेट कार्यक्रमानंतर वाचनालयाच्या शेजारीत श्री देवी सातेरी मंदिरात ह .भ. प. विष्णुबुवा शेटगांवकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले .प्रभाकर गावकर (संवादिनी) व अजय शेटगांवकर (तबला) यांनी त्यांना साथ संगत केली .कार्यक्रमात मनोहर शेटकर वाचनालय उभारणीपासूनचे कार्यकारिणीचे सक्रिय सभासद यांचा संस्थेचे अध्यक्ष फटू नारायण धर्णे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

