कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशैक्षणिकसिंधुदुर्ग

आशा स्वयंसेविका साठीच्या निबंध लेखन स्पर्धेत सुधा बांदेकर प्रथम

*🛑आशा स्वयंसेविका साठीच्या निबंध लेखन स्पर्धेत सुधा बांदेकर प्रथम*

 

*🛑वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली, वेंगुर्ले आयोजन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ला, दि- ०२:-* आशा स्वयंसेविका यांच्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने ‘स्त्रियांवरील अत्याचार: कारणे आणि उपाय’ या विषयावर आयोजित निबंध लेखन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये एकूण ७३ स्पर्धक महिला सदस्यांनी सहभाग घेत आपल्या विचारांची मांडणी केली.सदर स्पर्धेने महिलांच्या सक्षमीकरण आणि त्यांच्या विचारांची मांडणी करण्याचा एक उत्कृष्ट व्यासपीठ प्रदान केले. यामुळे महिलांना त्यांच्या सामाजिक, मानसिक आणि शारीरिक अधिकारांसाठी आवाज उठवण्याची संधी मिळाली. आशा स्वयंसेविका या क्षेत्रात काम करत असताना त्यांच्यावर होणाऱ्या दबावांविरुद्ध, त्यांचा आवाज आणि कृत्य महत्वाचे ठरतात. अशा प्रकारच्या स्पर्धा महिलांच्या जागरूकतेत वाढ करतात आणि त्यांच्या समाजातील स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

*स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:*

*प्रथम: सुधा संदीप बांदेकर (बांदा)*

*द्वितीय: अर्पिता अनंत गवंडे (उभादांडा)*

*तृतीय: स्नेहल सखाराम गायचोर (परबवाडा)*

*उत्तेजनार्थ प्रथम: राजश्री राजन पालकर (पाल – आसोली)*

*उत्तेजनार्थ द्वितीय: संजना सदानंद बेहरे (तुळस)*

आशा स्वयंसेविकांसाठी सर्वात प्रथम निबंध लेखन स्पर्धा घेण्याचा मान वेताळ प्रतिष्ठान आणि कै. गणेश दाभोलकर मेस्त्री मंच यांना मिळाला. या दोन्ही संस्थांकडून महिलांसाठी विविध निबंध लेखन स्पर्धा सातत्याने आयोजित केल्या जातात. या अगोदर शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्य, ग्रामपंचायत महिला सदस्य, अंगणवाडी ताई आणि सेविका यांच्यासाठीही निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, चित्रफ्रेम, मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परिक्षण मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका शैलजा परुळकर आणि मिलन तिरोडकर यांनी केले.

 

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!