आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 आमदार दीपक केसरकरांनी चाणक्य खेळीने यश संपादन केले..

🛑 केसरकरांना उच्चस्तरीय कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी मतदारसंघातील लोकांची अपेक्षा..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत

🎴सावंतवाडी, दि-२६:- सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सहजासहजी विजय मिळविला नसून तो खेचून आणला आहे. केसरकर यांना चहुबाजूनी विरोधकांनी घेरले होते. त्यांच्या या खेळीला केसरकर यांनी आपल्या चाणक्य खेळीने यश संपादन केले. ज्या प्रकारे अभिमन्यूने चक्रव्यूह भेदली त्याच पद्धतीने त्याच युक्तीने त्यांची रणनीती यशस्वी ठरली, केसरकर हे या भागात केलेल्या विकास कामावर भर देत प्रचारात उतरले होते तसेच व्यक्तिगत संपर्क दांडगा होता सर्वच तऱ्हेच्या लोकांशी त्यांनी संधान साधले होते तसेच केसरकर यांनी आपली वेगळी फळी निर्माण केली होती त्याचाही फायदा पक्षाप्रमाणेच मिळाला केसरकर हे अनुभवी ज्येष्ठ मंत्री असल्याने त्यांना यावेळी एखादे उच्चस्तरीय कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी या मतदारसंघातील लोकांची अपेक्षा आहे, केसरकर हे महायुतीतील सर्वच नेत्यांची जवळचे संबंध ठेवून आहेत त्यामुळे साहजिकच त्यांना या पदासाठी फारशी मेहनत न घेता त्यांना या उच्च पदी नियुक्ती मिळू शकेल या मतदारसंघात त्यांनी काम करत असताना कुडाळ सारख्या दुसऱ्या मतदारसंघातही पक्षाची बाजू भक्कमपणे सांभाळली व त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा आमदार होण्याकरीता आपले सर्व डावपेच या ठिकाणी खर्ची घातले त्याचाच भाग म्हणून केसरकर हे पुन्हा मंत्री होतील याबाबत शंका नाही.

केसरकर यांच्यावर सर्वच विरोधकांनी केलेले आरोप प्रत्यारोप त्यांनी योग्य तऱ्हेने हाताळले व लोकांना आपल्यावर होत असलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे पटवून देण्यास ते यशस्वी झालेत, यामुळेच त्यांना हे यश संपादन करणे सोपे झाले शिवाय महायुतीतील भाजप नेते खासदार नारायण राणे यांचीही मर्जी सांभाळण्यास ते यशस्वी ठरले व त्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला.

केसरकर हे व्हिजन असलेले नेते असून त्यांनी या जिल्ह्यात पर्यटनावर यापूर्वी भर दिला तसेच त्यांच्या कडे या जिल्ह्याचा भौगोलिक विकास कसा असावा याचे त्यांच्याकडे उत्तम ज्ञान आहे. त्याचा उपयोग ते यावेळी निश्चितच करतील यामुळे जिल्ह्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लागतील शिवाय येतील तरुणांना रोजगार निर्माण व्हावा याकरता नवनवीन उद्योग उभारले जातील अशी अपेक्षा या निमित्ताने मतदार बाळगून आहेत.या जिल्ह्यात व पर्यायाने राज्यात व केंद्रात एक हाती सत्ता असल्याने या जिल्ह्यामध्ये विकास करण्यास कोणतीच अडचण निर्माण होणार नाही शिवाय या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री आत्ताचे खासदार नारायण राणे यांचे त्यांना सहकार्य निश्चितच मिळेल, विरोधकांकडून ज्या पद्धतीने केसरकरांच्या कार्याविषयी ज्या पद्धतीने प्रचाराची यंत्रणा कार्यरत होती त्यावरून केसरकर या अवघ्या काही मतानेच निवडून येतील अशा प्रकारचा राजकीय जाणकारांचा तर्क होता मात्र केसरकर यांनी घेतलेली मतांची आघाडी पाहता धक्कादायक तितकाच आश्चर्यकारक निकाल होता.

केसरकर यांनी आमदार व मंत्री या काळात बरीच कामे मंजूर करून आणण्यात यशस्वी झालेत मात्र त्या कामांचे श्रेय घेण्यास ते कमी पडले, किंबहुना त्यांची या ठिकाणी कार्यपद्धती वेगळी होती शिवाय या भागात कामे झालीत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे झालेत मात्र काही भागात कामांची कमतरता भासली कोणत्या कामाला क्रम द्यावा यामध्येही त्यामुळे सहाजिकच काही लोकांचा रोषालाही सामोरे जावे लागले ही कार्यपद्धती, यावेळी निश्चितच केसरकर बदलतील अशी अपेक्षा लोकांत आहे सहकारी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांचीही कामे काही प्रमाणात झाली नसल्याचे निवडणुकीदरम्यान केसरकर यांच्या तक्रारी होत्या मात्र यामध्ये केसरकर यांनी सहकारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून त्यांनाही आपल्यामध्ये यावेळी राजी करून घेतले, त्यामुळे साहजिकच यापुढे मित्र पक्षालाही प्राधान्याने विकास कामात सामावून घ्यावे लागेल जेणेकरून मित्र पक्षाने दाखविलेला विश्वास त्यांना सार्थकी देण्याकरता काही कटू निर्णय घ्यावे लागतील हे मात्र निश्चित.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!