वीजबिले न भरण्याचा निर्णय घेताच अखंडित वीजपुरवठा
*🛑वीजबिले न भरण्याचा निर्णय घेताच अखंडित वीजपुरवठा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२६:-* तालुक्यातील नांदगाव विभागातगेले काही महिने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत होता. याबाबत आंदोलन तसेच पत्राद्वारे लक्ष वेधूनही काही सुधारणा होत नसल्याने अखेर नांदगाव दशक्रोशीतील सर्व वीज ग्राहकांनी एकत्र येत सामूदायिकरित्या वीजबिले न भरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता महावितरणकडून या महिन्यात अखंडित वीजपुरवठा करण्यात आला असून उर्वरित काम पूर्ण करून वीजपुरठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, तरी वीजबिलाची भरणा करून सहकार्याचे आवाहन वीज वितरणने केले आहे. नांदगाव दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी अनेकदा पत्रं पाठवून, आंदोलन करूनही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्राहकांनी वीजबिलांवर बहिष्कार टाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सोसाट्याचा वारा, पाऊस यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे वीजबिल भरणा न करण्याचे आपण ठरविले होते. त्या अनुषंगाने आमच्या शाखा कार्यालयाकडून बऱ्याच ठिकाणी कामे करण्यात आली आहेत. या महिन्यात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा दिलेला आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अतिनगण्य झालेले असून सर्व वीज ग्राहकांनी वीजबिले भरून महावितरणला सहकार्य करावे. तसेच असलदे ते तळेबाजार या पर्यायी ३३ केव्ही लाईनचे काम प्रगतीपथावर असून आपल्याला अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

