नेरूरचे सुपुत्र विमा सल्लागार यशवंत नाईक यांना मिळाला MDRT USA 2021(एम डी आर टी अमेरिका) विमा क्षेत्राचा जागतिक पुरस्कार..
▪️अवघ्या अडीज वर्षाच्या एजन्सी करिअरमध्ये मिळवले अभूतपूर्व यश; शाखाधिकारी सुशांत देशपांडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴कुडाळ,दि.२१: भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा कुडाळ येथे शाखाधिकारी श्री. सुशांत देशपांडे, सावंतवाडी शाखाधिकारी श्री. लोभस गरुड, टिम लिडर श्री. सुरेश शेटये, आणि प्रशासकीय अधिकारी श्री. मोतीराम प्रभू बहुसंख्य विमा प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील नेरूरचे सुपुत्र श्री. यशवंत नाईक यांचा हा पुरस्कार मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना श्री. देशपांडे म्हणाले, श्री. यशवंत नाईक यांनी विमा क्षेत्रातील बहुप्रतिष्ठित समजला जाणारा मानाचा किताब MDRT USA अवघ्या कमी कारकीर्दीत मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यशवंत नाईक यांच्या कामगिरीचा चढता आलेख असून एजन्सीच्या पहिल्या दोन्ही वर्षात 200 पेक्षा जास्त पॉलिसी करून दोनवेळा द्विशतकवीर चा सन्मान मिळवलेला आहे. त्यांची ही कामगिरी खरोखरच अद्भुत आणि कौतुकास्पद आहे.

सावंतवाडी शाखाधिकारी श्री. गरुड यांनीही श्री यशवंत नाईक यांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली. नाईक यांच्या मनमिळाऊ स्वभाव, शांत संयमी वृत्तीचा ही त्यांनी आवर्जून उल्लेख केला व यापुढेही कामगिरी चा आलेख चढता राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रशासकीय अधिकारी श्री. प्रभू म्हणाले, श्री यशवंत नाईक हे विमा विक्री पश्चात ग्राहकांना गरजेची असलेली सर्व सेवा देतात. हे त्याच्या यशाचे गमक असल्याचे म्हणाले.

याप्रसंगी सत्कार मूर्ती श्री. यशवंत नाईक म्हणाले, मला मिळालेल्या MDRT पुरस्काराचे सर्व श्रेय माझे गुरुवर्य व मार्गदर्शक टिम लिडर श्री. सुरेश शेटये सर आणि माझे सर्व विमाधारक यांना जाते. जीवनात आतापर्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असे सर्व गुरुजन या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी दिले. विशेष म्हणजे माझे गुरू श्री. सुरेश शेटये सर सलग दहा वर्षे MDRT USA हा जागतिक सन्मान मिळवणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव प्रोफेशनल विमा सल्लागार आहेत. अशा यशस्वी, अनुभवी गुरूंकडून मार्गदर्शन लाभल्याने या पुरस्काराचा मानकरी होऊ शकलो. श्री. सुरेश शेटये यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

श्री. सुरेश शेटये यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, श्री यशवंत नाईक यांनी हे अभूतपूर्व यश मिळवले आहे. नावाप्रमाणेच यशवंत तर तो आहेच! हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. यशवंत मधील चांगल्या मनमिळाऊ स्वभावामुळे, ध्येय,चिकाटी व मेहनत हे सर्वगुण आत्मसात करण्याबरोबरच नवनवीन आवश्यक गोष्ट शिकण्याकडेही त्यांचा प्रयत्न सुरू आहेत. यामुळेच ते आज अल्पावधीतच अशा जागतिक पुरस्काराचे मानकरी ठरले असे भरभरून कौतुक त्यांनी केले. संपूर्ण जगभरातून बहुसंख्य देशातील विमा कंपन्याचे विमाप्रतिनिधी जे जागतिक निकषाप्रमाणे काम करतात, त्यांनाच हा जागतिक MDRT सन्मान बहाल केला जातो. अशा सर्व MDRT पुरस्काराने सन्मानित प्रोफेशनल विमाप्रतिनिधीचे संमेलन अमेरिका मध्ये दरवर्षी घेण्यात येते. या कार्यक्रमास श्री. यशवंत नाईक आपली उपस्थिती दर्शवतील असा विश्वास श्री. शेटये यांनी व्यक्त केला.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

