महायुतीचे उमेदवार निलेश राणेंवर घराणेशाहीची टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांचे मातोश्रीच्या युवराजांसमोर “घालीन लोटांगण वंदिन चरण..!”

*🛑महायुतीचे उमेदवार निलेश राणेंवर घराणेशाहीची टीका करणाऱ्या उबाठा नेत्यांचे मातोश्रीच्या युवराजांसमोर “घालीन लोटांगण वंदिन चरण..!”*

*🛑”आपलं ठेवावं झाकून अन दुसऱ्याचं पहावं वाकून”*

*शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचे उबाठा नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-११:-* मागील दहा वर्षात निष्क्रिय ठरल्याने कुडाळ मालवण मधील जनतेचा असंतोष पाहता उबाठा पक्षाच्या नेत्यांना पराभवाची चाहूल लागलेली असून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ते महायुतीचे उमेदवार निलेश राणेंवर घराणेशाहीची टीका करून मतदार संघातील मूळ प्रश्नांना बगल देऊ पाहत आहेत.मात्र एकीकडे राणे कुटुंबावर घराणेशाहीचे आरोप करायचे आणि दुसरीकडे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे व नातेवाईक वरुण सरदेसाई यांचेसमोर लोटांगण घालायचं अशी उबाठा नेत्यांची दुटप्पी भूमिका जनता पार ओळखून आहे.याशिवाय उबाठा ज्या काँग्रेस पक्षा सोबत आघाडीत आहे त्यात श्रीमती सोनिया गांधी,राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि राष्ट्रवादी (शरद पवार) मधील सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काय मत आहे हे उबाठा नेत्यांनी जनतेसमोर जाहीर करावे.निलेश निलेश राणेंचे नेतृत्व हे कार्यकर्तृत्वातून पुढे आलेले असून ते उद्धव किंवा आदित्य ठाकरेंसारखे लादलेले नेतृत्व नाही.”आपलं ठेवावं झाकून अन दुसऱ्याचं पाहावं वाकून” अशी अवस्था उबाठा नेत्यांची असून मतदार संघातील मूळ प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत. कुडाळ मालवण मतदार संघ मागील दहा वर्षे खितपत का राहिला, का विकसित होऊ शकला नाही, मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत विधिमंडळात ताकदीने का प्रश्न उपस्थित करून सोडवू शकला नाहीत, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने कुडाळ मालवण मतदार संघात येणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व तालुका ग्रामीण रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टर येण्यासाठी खासदार वं आमदान म्हणून कोणते प्रयत्न केलात हिम्मत असेल तर याची उत्तरे द्या. माजी खासदार विनायक राऊत असो वा आमदार वैभव नाईक हे जबाबदार उबाठा नेते 2014 मध्ये लावलेली कॅसेट तीच पुन्हा 2024 मध्येही जनतेला ऐकवू पाहत आहेत. तुमच्या मातोश्रीवरील निष्ठेशी जनतेला सोयरे सुतक नसून मतदार संघावर तुम्ही केलेल्या अन्यायाचा वचपा कुडाळ मालवणची जनता येत्या 20 तारीख ला काढणार आहे असे जोरदार प्रत्युत्तर शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!