कोकणमहाराष्ट्रवैभववाडी

नानिवडेत उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

*🛑नानिवडेत उबाठाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र*

*🛑उबाठा सेनेचे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख व दोन ग्रा.पं. सदस्यांचा भाजपात प्रवेश*

*🛑आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴वैभववाडी, दि-०६:-* तालुक्यातील नानिवडे येथील उबाठा सेनेचे शाखाप्रमुख दीपक साळवी, उपशाखाप्रमुख संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण साळवी, ग्रामपंचायत सदस्या प्रभावती महाजन यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुरेश साळवी, भिकाजी साळवी, तुकाराम गावडे, ऋषिकेश जाधव, बाळकृष्ण गोरूले, सखाराम शिवगण, प्रकाश महाजन, गोविंद वाडेकर, सार्थक महाजन व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांनी उबाठा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले. भाजपा पक्षात प्रवेश करणाऱ्यां सर्व पदाधिकाऱ्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान केला जाईल असा विश्वास सर्वांना दिला.
ऐन निवडणूकीच्या तोंडावर उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के मिळत असून उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेशाचे इंनमिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, राजेंद्र राणे, सचिन महाजन व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!