दुचाकीने गांजा विक्रीस नेणाऱ्या युवकास अटक
*🛑दुचाकीने गांजा विक्रीस नेणाऱ्या युवकास अटक*
*🛑कणकवली पोलीस, एलसीबी पथकाची संयुक्त कारवाई : संशयिताला चार दिवसांची कोठडी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०६:-* विक्रीच्या उद्देशाने दुचाकीवरून गांजा वाहतूक करणाऱ्या रियाज हुसेन बोत्रे (४२, उंबर्डे मेहबुबनगर, ता. वैभववाडी) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व कणकवली पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडील दुचाकी व ४७ हजार ४०० रुपयांचा १.५८० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई महामार्गावरील हुंबरट येथील उड्डाणपुलाखालील साकेडी फाटा अंडरपास येथे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. एलसीबीचे पथक कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अनधिकृत वाहतुकीस आळा बसावा,
यासाठी एलसीबीचे पथक सज्ज आहे. पेट्रोलिंग करणाऱ्या एलसीबीच्या पथकाला महामार्गावरून दुचाकीने गांजा वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. वाहतूक महामार्गावरून होत असली, तरी हुंबरट दरम्यान संशयित सर्व्हिस रोडवरून पुढे जाणार असल्याचेही पथकाला समजले. एलसीबीच्या पथकाने सर्वप्रथम कणकवली पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर एलसीबी पथक व कणकवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या हुंबरट येथील साकेडी फाटा अंडरपासनजीक सापळा रचला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित रियाज आपल्या ताब्यातील पॅशन प्रो दुचाकीने वैभववाडीहून कणकवलीच्या दिशेने येताना दिसला. दोन्ही पथकांनी संशयिताला थांबवून तपासणी केली असता दुचाकीच्या हँडलला एक पिशवी लटकविलेली दिसली. पिशवीची तपासणी केली असता आतमध्ये ओल्या स्वरुपातील गांजा आढळून आला. तपासणीअंती त्याचे वजन १५८० किलो एवढे भरले. संशयितास अटक करून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्यावर अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमध्ये एलसीबीचे उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहाय्यक उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार प्रकाश कदम, किरण देसाई, आशिष गंगावणे, बस्त्याव डिसोजा, महिला पोलीस स्वाती सावंत, श्रीमती झेमणे, कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, हवालदार पांडुरंग पांढरे, रुपेश गुरव सहभागी झाले होते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

