कुडाळकोकणमहाराष्ट्र

पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला न्यायालयीन कोठडी

*🛑पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला न्यायालयीन कोठडी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-०५:-* भडगाव बु. येथील राहत्या घरात आपली पत्नी रेणुका सिंह हिचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या ओमप्रकाश बंधन सिंह (५२, सध्या रा. भडगाव बु., मूळ रा. झारखंड) याला रविवारी येथील न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ओमप्रकाश सिंह आपली पत्नी रेणुका सिंह हिच्या चारित्र्याचा संशय घ्यायचा. तो कामानिमित्त भडगाव बु. येथे भाड्याने राहत होता. त्याची पत्नी रेणुका व मुले नेरुर-कविलगाव येथे भाड्याने राहत होती. ओमप्रकाश याने रेणुका हिला १३ ऑक्टोबर २०२४ रोजी भडगाव येथे बोलावून घेतले आणि रात्रीच्यावेळी तिचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर तो पळून गेला होता. या घटनेबाबत त्याने आपली मुलगी रिया सिंह (१९) हिला मोबाईलवरून कल्पना दिली. त्यानंतर घटनास्थळी खात्री केल्यानंतर रेणुका हिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत रिया
हिने कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ओमप्रकाश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रेणुका हिचा खून केल्यानंतर ओमप्रकाश सिंह हा पळून गेला होता. त्याचा मोबाईल बंद मिळत होता. त्यामुळे त्याचा काहीच सुगावा लागत नव्हता. मुंबईनंतर त्याचे मोबाईल लोकेशन मिळत नव्हते. त्याने नवीन सीमकार्ड घेत आपल्या मोबाईलमध्ये घातले. त्यामुळे पोलिसांना काही दिवसांनी त्याचे लोकेशन मिळाले होते. झारखंड-हिंदगिरी या भागात तो वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तेथे जात त्याला शिताफीने ताब्यात घेतले होते.
३० ऑक्टोबर रोजी त्याला अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची पोलीस कोठडी आज संपल्याने पोलिसांनी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!