कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आजगाव अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा

*🛑आजगाव अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०५:-* आजगाव-वाघबीळ येथे दुचाकी व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांना दुखापती व दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी अहमदनगर येथील चारचाकी चालक चांगदेव सीताराम पारखे याच्यावर मोटर व्हेईकल अॅ क्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खानोली-आंबेसवाडी येथील मनोहर विश्वनाथ राऊळ (३१) हे दुचाकीने वाडीतील प्रथमेश प्रभू यांच्यासोबत गोवा येथून आजगाव शिरोडा मार्गे खानोली येथे जात असताना त्यांच्या सीडी १०० मोटरसायकलला (एमएच ०७ एएन ४८४६) श्रीरामपूर- कुरानपूर येथे जाणाऱ्या इर्टिका कार (एमएच १७ एयू ९०९१) चे चालक चांगदेव सीताराम पारखे (२१) याने रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आजगाव वाघबीळ येथे धडक दिली. अपघातात खानोली आंबेसवाडी येथील मनोहर विश्वनाथ राऊळ व त्यांच्या सोबत असलेले प्रथमेश प्रभू हे दोघे जखमी झाले. तसेच त्यांच्या मोटरसायकलचे नुकसान झाले.
अपघातप्रकरणी मनोहर विश्वनाथ राऊळ यांनी वेंगुर्ले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार इर्टिका कारचा चालक चांगदेव सीताराम पारखे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोडा पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार गजेंद्र भिसे व हेडकॉन्स्टेबल योगेश राऊळ करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!