*नरकासुराला हरविण्यासाठी युद्धाचा नाहीतर मताचा वापर करा
*नरकासुराला हरविण्यासाठी युद्धाचा नाहीतर मताचा वापर करा*
*लक्ष्मीची पावले घरी यायला पाहिजे तर नरकासुराला पराभूत केलेच पाहिजे*
बांदा दि.३० आक्टोबर
घरोघरी लक्ष्मीची पावले जायला पाहिजेत, सर्व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजेत त्यामुळे यावेळी अपुरे प्रकल्प, कामे व विविधांगी योजना साकार करण्यासाठी आमदार म्हणून काम करणार आहे. या युगात नरकासुराला हरविण्यासाठी संविधानाने मतदारांना अधिकार दिला आहे, तो प्रत्येक मतदार वापरून मला चौथ्यांदा विजयी करेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील जनतेला शेती, कृषी, मच्छीमारी, पर्यटन, महिलांसाठी स्वयंरोजगार, आंबा बागायतदार, शेतकरी अशा प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न योजना, चांदा ते बांदा योजना आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्न केला आहे असे त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, आताच्या युगात नरकासुराचा हरवण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी थेट युद्ध करण्याची गरज नसून, संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचा उपयोग करून सत्ता स्थान काबीज करू पाहणाऱ्या नरकासुराला हरवा अशी जोरदार टीका दीपक केसरकर यांनी विरोधकांवर नाव न घेता केली आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.