करियरकुडाळक्रीडासामाजिकसिंधुदुर्ग

नॅशनल कबड्डी मॅच गोवा बानवली चर्च मैदान स्पर्धेत ‘नानेली’च्या सुकन्येने मिळवले सुवर्णपदक..

▪️आगामी काळात नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ‘कु.श्रावणी धुरी’ची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ

🎴कुडाळ,दि.१९: नॅशनल कबड्डी मॅच गोवा बानवली चर्च मैदान येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटांचा समावेश केला होता. ही स्पर्धा १५ ते १७ जानेवारी २०२१ रोजी दरम्यान घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांचा समावेश होता. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील एकुण ५५ खेळाडू सहभागी झाले होते. यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मुलगे तर १ मुलगी सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये महिला गटात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला. गोवा येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील नानेली गावची दत्त स्पोर्ट माणगावची खेळाडू कु.श्रावणी संजय धुरी महाराष्ट्र संघांमध्ये उपकप्तान म्हणून खेळली होती. या स्पर्धेत कु.श्रावणीने सुवर्णपदक मिळवून यश प्राप्त केले आहे. तसेच आगामी काळात नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कु.श्रावणी धुरी हिची निवड झाली आहे. त्याबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!