बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या कारची स्टॉल व दुचाकीना धडक देत पलायन
बांदा । प्रतिनिधी : बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्या मोटारीचा पाठलाग करीत असताना चक्क वाहतूक पोलिस राजा राणे यांच्या अंगावर गाडी घालत तसेच भर बाजारपेठेतील स्टॉल व दुचाकींना धडक देत मोटार चालकाने पलायन केले. यासाठी मोटार चालकाने तब्बल अर्धा किलोमीटर थरारक रिवर्स गाडी चालविली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून कॅमेरे बंद असल्याने स्थानिक आक्रमक झाले आहेत.
ही घटना बांदेश्वर मंदिर नाका येथे सायंकाळी उशिरा घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मोटार चालक पत्रादेवी येथून बांद्यात मोटारीतून दारूची बेकायदा वाहतूक करत होता. बांदेश्वर मंदिर रस्त्यावर वाहतूक पोलिसाला पाहून चालकाने तब्बल अर्धा किलोमीटर गाडी मागे नेली. पोलिसाला संशय आल्याने त्याने पाठलाग केला. त्यावेळी पाठीमागील स्टॉल व दुचाकीला जोरदार धडक दिली. तसेच पोलिसाला चकवा देण्यासाठी वाहतूक पोलीस राणे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगवधान दाखवत राणे यांनी उडी मारल्याने ते बचावलेत. या घटनेमुळे स्थानिक आक्रमक झालेत.