मुद्रांक अधिनियमातील सुधारणा सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी
*🛑मुद्रांक अधिनियमातील सुधारणा सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१७:-* विविध कामांसाठी शासकीय पातळीवर करायच्या प्रतिज्ञापत्रांसाठी यापूर्वी १०० रुपयांचा बाँडपेपर वापरण्यात येत होता. मात्र, शासनाने महाराष्ट मुद्रांक अधिनियमात केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने आता ‘अशा’ सर्व कामांसाठी ५०० रुपयांचा बाँडपेपर अनिवार्य करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी तहसीलदार पातळीवर सुरू करण्यात आली असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी विविध प्रतिज्ञापत्रे, करार अशा विविध कामांसाठी यापूर्वी १०० रुपयांच्या बाँड पेपरवर काम होत असे. मात्र, ज्या कामांसाठी पूर्वी १०० अथवा २०० रुपयांच्या बाँडवर कामे होत होती, त्या सर्व कामांसाठी आता ५०० रुपयांचा बाँड आवश्यक करण्यात आला आहे. मात्र, जी कामे पूर्वी १०० रुपयांच्या बाँडवर होत होती, त्यासाठी ५०० रुपयांचा बाँड अनिवार्य करण्यात आल्याने सर्वसामान्यांची मोठी अडचण होऊ लागली आहे. वास्तविक १०० रुपयांचा बाँड हा अनेक कामांसाठी केवळ एक कागदपत्र एवढ्याच मर्यादीत असतो. त्यामुळे पूर्वी जी कामे १० अथवा २० रुपयांच्या बाँडवर होत होती, ती कामे सदरचे बाँड बंद केल्याने १०० रुपयांच्या बाँडवर करण्यात येऊ लागली. मात्र, आता याच कामांसाठी तब्बल पाचपट पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांतून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तहसीलदार कार्यालयांमध्ये आता प्रतिज्ञापत्रांसाठी ५०० रु.च्या खाली प्रतिज्ञापत्रे करण्यास नियमानुसार नकार देण्यात येत आहे. अशा स्थितीत नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत असून शासनाने पूर्वीप्रमाणे ही कामे १०० रुपयांच्या बाँडवर करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

