तालुका स्तरावर फुटबॉल लीग मध्ये बांद्याच्या नाबर शाळेचे यश
*🛑तालुका स्तरावर फुटबॉल लीग मध्ये बांद्याच्या नाबर शाळेचे यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१७:-* दिनांक १६ऑक्टोबर २०२४ रोजी आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या पी एफ डोन्टल तालुका लेवल फुटबॉल लीग मध्ये बांद्याच्या व्ही.एन.नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षे वयोगटातील तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलांचा फुटबॉल संघ दोन्ही भागांत पहिल्या क्रमांकाने यशस्वी ठरला.
१७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघातील हर्ष राजेश हुमरसकर याने गोल करून दिव्य ज्योती शाळेला १-० ने बाद करून विजय मिळवला.
१७ वर्षांखालील संघातील खेळाडू -कर्णधार दर्शिल वसंत राऊळ,गोविंद गावकर,वेदांत गवस, रितेश धामापूर,सुयश गावकर,अमृत पेंडूरकर, दत्ताराम भिसे,शशिकांत धुरी,साईश वेंगुर्लेकर, प्रसाद गवस,समर्थ कामत,मितेश मयेकर,रिदान खतिब , ओम गावकर
१४ वर्षांखालील संघातील खेळाडू -कर्णधार सोहम सागर सातार्डेकर,प्रणय नाईक,संस्कार शिरोडकर,तेजस गावकर,रामा मालवणकर,ऋतुराज नाईक,आधिराज गवळे,शुभम शिरोडकर, दुर्वांग मालवणकर,साईराज पेडणेकर,पार्थ सुतार,भागवत सारंग.
तर १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघातील तेजस शरद गावकर,पार्थ संजय सुतार,ऋतुराज दिगंबर नाईक यांनी गोल करून सेंट झेवियर्स स्कूल आजगाव यांना पॅनेल्टी ३-० ने बाद करून घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेत १७ वयोगटातील आपला विद्यार्थी कु.गोविंद विठोबा गावकर तसेच कु.सोहम सागर सातार्डेकर यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
या दोन्ही संघाना शाळेचे क्रिडा शिक्षक श्री. प्रशांत देसाई यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई व शाळेच्या इतर शिक्षकांनी त्यांची पाठ थोपटली तसेच संस्थेचे
श्री.मंगेश कामत, श्री.योगेश्वर पाडलोस्कर,श्री.त्रिविक्रम उपाध्ये,श्री.बालेंद्र सतरकर व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री दौलतराव देसाई तसेच शाळेचे सर्व हितचिंतकांनी या खेळाडू विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

