कोकणसिंधुदुर्ग

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची मागणी

*🛑अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-१५:-* माता वैष्णोदेवी कॉलेजच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागातील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दुसऱ्यांदा पुनर्तपासणी करण्याची मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. यात यश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना २१ नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या परीक्षेवेळी पुन्हा परीक्षा द्यावी लागेल आणि त्यासाठी परीक्षा शुल्क महाविद्यालयाकडून भरणा करण्यात येईल. विद्यार्थ्यांना कोणताही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही, असे या कॉलेजचे अध्यक्ष कॅप्टन विलास सावंत यांनी सांगितले. या महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अॅडव्हॉन्स फूड प्रॉडक्शन या विषयाची चुकीची प्रश्नपत्रिका महाविद्यालय व्यवस्थापनाकडून देण्यात आल्यामुळे २४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा आरोप होता. त्यांनतर पुनर्पडताळणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर अन्य १९ विद्यार्थ्यांचा शेरा अनुत्तीर्ण असाच राहिला होता. महाविद्यालयाच्या या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे अन्याय झाल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी
जिल्हाधिकारी आंदोलन छेडले होते. कार्यालयासमोर याबाबतच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने माता वैष्णोदेवी फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन विलास सावंत यांनी महविद्यालय व्यवस्थापनाची पुढील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पंत्रकात म्हटले आहे की, महाविद्यालय २०१६ पासून ओसरगाव येथे सुरू असून मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. या महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंट विभागांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ‘या शैक्षणिक वर्षाची अंतिम परीक्षा मे, जूनमध्ये पार पडली. परीक्षेचा निकाल विद्यापीठाने जाहीर केल्यानंतर २४ विद्यार्थी अॅडव्हान्स फूड प्रॉडक्शन या विषयामध्ये अनुत्तीर्ण झाले. सदर विद्यार्थ्यांनी सदर विषयाची उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी विद्यापीठाकडे विनंती केली. त्यानंतर विद्यापीठाने सदर विषयाची पुनर्तपासणी केली. त्यात २४ पैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु १९- विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाले. विद्यापीठाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा असून महाविद्यालय विद्यार्थ्यांबरोबर कायम राहील, याची ग्वाही देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!