कुडाळकोकणमहाराष्ट्र

महालक्ष्मी मंदिरनजीक भक्तनिवास उभारणार!

*🛑महालक्ष्मी मंदिरनजीक भक्तनिवास उभारणार!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१४:-* नारुरचे महालक्ष्मी मंदिर पर्यटन ‘क’ क्षेत्रात येत असून तेथे भाविकांची संख्या वाढणार आहे. भाविकांसाठी मंदिरानजीक भक्तनिवास उभारले जाईल, असे आश्वासन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारुर येथे दिले. स्वच्छतागृह इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नारुर महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार नाईक यांनी पावणेनऊ लाख रु. स्थानिक विकास निधीतून तातडीने मंजूर केले होते. या निधीतून बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृह इमारतीचे उद्घाटन नाईक यांच्या उपस्थितीत झाले. याबद्दल महालक्ष्मी देवस्थान समिती (नारुर), चार बारा मानकरी, बहुमानकरी, नारुर ग्रामस्थ, नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे समाधान व्यक्त करीत आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छतागृहाअभावी भाविकांची गैरसोय होत होती. याबाबत आमदार नाईक यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली असता, त्यांनी या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या कामासोबत मंदिर परिसरात आमदार यांच्या निधीतून पेव्हर्स, हायमास्ट दिवेही बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. नाईक म्हणाले, या देवीच्या आशीर्वादामुळेच अशी समाजोपयोगी कामे मार्गी लागत आहेत. दुरून अनेक भाविक देवीच्या दर्शनाला येतात. मात्र, येथे स्वच्छतागृह नसल्याने ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मंदिरानजीक भक्तनिवास उभारले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हाप्रमुख संजय पडते, महालक्ष्मी देवस्थान समिती चार बारा मानकरी, बहुमानकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!