मंत्री दिपक केसरकरांना ह्यावेळी सहकार्य करणार नाही :कोलगाव सरपंच संतोष राऊळ
मंत्री दिपक केसरकरांना ह्यावेळी सहकार्य करणार नाही :कोलगाव सरपंच संतोष राऊळ
आम्ही सदैव भाजप व महेश सारंग यांच्या पाठीशी
कोलगाव गावामध्ये श्री देव कलेश्वर व श्री देवी सातेरी अशी दोन देवस्थाने असून ह्या दोन्ही देवस्थानांचा प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत सन. २०२४-२५ च्या विकास आराखड्यामध्ये १ कोटी ९८ लाख रुपयांचा अंदाजित रक्कमेचा आराखडा पाठविण्यात आला होता . परंतु मंत्री दिपक केसरकर यांनी आमच्या गावाच्या देवस्थानसाठी अवघे ९० लाख देऊन आमच्या गावाची पसवणूक केली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी व महेश सारंग यांच्या सदैव पाठीशी आहोत, असे प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सरपंच संतोष राऊळ यांनी स्पष्ट केले आहे.
सदरील देवस्थानांसाठी कमी निधी देऊन मंत्री दिपक केसरकर यांनी आमची फसवणूक केली आहे त्या कारणाने मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रचारवर बहिष्कार असल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. आम्हाला ९० लाख नकोच आहेत. आम्हाला १ कोटी ९० लाखच पाहिजेत. जर आम्हाला येवढी रक्कम न मिळाल्यास आमचा गाव आपल्या प्रचार यंत्रणेत सहभागी होणार नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

