कशाला येते रिक्षा स्टँड फलकाचे अनावरण..
कसाल येथे रिक्षा स्टँड चे फलकाचा शुभारंभ
मुंबई-गोवा महामार्गावर गेली दोन वर्षे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे कसाल एसटी स्टँड समोर रिक्षा व्यवसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते , मात्र सर्विस रस्त्याची बाजूची काम पूर्ण झाल्याने कसाल एसटी स्टँड समोर पुन्हा एकदा नव्या जोषात रिक्षा संघटनेचा बोर्ड आज उभा राहिला आहे. या बोर्ड चे शुभारंभ कसाल पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर व उपसरपंच दत्ताराम सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.
करोना च्या महामारी मध्ये सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते त्यामुळे रिक्षा व्यावसायिकही रिक्षा बंद ठेवून घरातील छोटी मोठी काम करून उदरनिर्वाह करत होते मागील दोन चार महिन्यापासून सुरळीत रिक्षा व्यवसाय सुरू झाल्याने आता पुन्हा जोमाने व्यवसाय करण्यासाठी रिक्षा चालक मालक व्यवसायिक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत त्यामुळे पुन्हा एसटी स्टँड समोर गर्दीचे साम्राज्य दिसत आहे व रिक्षाही दिसू लागल्या आहेत .गेली आठ नऊ महिने अनेक अडचणींना तोंड देत रिक्षा चालक मालक यांना पुन्हा जोमाने रिक्षा व्यवसाय सुरु केला असून 50/60 रिक्षा या संघटनेत असून ही रिक्षा चालक-मालक संघटना अधिकृत रजिस्टर असल्याने त्यांनी आजपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक , क्षेत्रातही पुढाकार घेऊन गरजूवंताना आर्थिक मदतीचा हात पुढे केलेला आहे ..
रिक्षाचालक-मालक संघाचे अध्यक्ष एन डी सावंत उपाध्यक्ष रुपेश हिंदळेकर,सचिव शिवराम सावंत, कसाल तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राणे सुनील आचरेकर राघोजी कदम, नरेश घाडीगावकर, नाना निर्गुण, संदीप राणे,गणेश पारकर, गोटया गावडे,अशोक आचरेकर, गणेश परब,मनोहर पेडणेकर, आनंद बांदेकर, आदीसह रिक्षा चालक-मालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते .