सिंधुदुर्गनगरी येथे २१ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव
*🛑सिंधुदुर्गनगरी येथे २१ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०५:-* जिल्हा युवा महोत्सव २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वा. जिल्हा नियोजन समिती हॉल, (नवीन) सिंधुदुर्गनगरी येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.
युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय व राज्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात २०२४-२५ मध्ये युवा महोत्सवाचे आयोजन राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करून राज्याचा प्रातिनिधिक चमू राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४-२५ मध्ये ‘विज्ञान व तंत्रज्ञान यातील नवसंकल्पना’ “Innovation in Science and Technology” ही संकल्पना दिली आहे. संकल्पनेवर आधारित जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम सादर होणार आहेत. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची नियमावली गुगल लिंकवर देण्यात
आली असून युवा महोत्सवात सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी गुगल लिंक फॉर्ममध्ये करावी.
सांस्कृतिक-समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कौशल्य विकास-कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी) फोटोग्राफी.
संकल्पना आधारित स्पर्धा- महाराष्ट्र राज्यासाठी, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, युवा कृती-हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅग्रो प्रॉडक्ट. जिल्हास्तर युवा महोत्सवात
सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक- युवतींना सहभागी होता येईल. युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धा पूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे करावी तसेच सहभागी होण्यासाठी गुगल लिंकवर २० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करावी. जिल्ह्यातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयातील व कृषी महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील जास्तीत जास्त युवक-युवतींच्या संघांनी, महिला मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले
आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

