पात्र लाभार्थीही आनंदाच्या शिध्यापासून वंचित
*🛑पात्र लाभार्थीही आनंदाच्या शिध्यापासून वंचित*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०१:-* सणासुदीला शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा १०० रुपयांत दिला जातो. मात्र, यावर्षी गणेशोत्सवानिमित्त शासनाने आनंदाचा शिधा जाहीर केला, तरीही पुरवठा विभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र लाभार्थी या शिध्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे प्रसंगी दुकानदारांशी वादाचे प्रसंग उद्भवले असून ज्या पात्र लाभार्थ्यांना हा शिधा मिळालेला नाही, त्यांना पुढील महिन्यात तो मिळवून देण्याची मागणी होत आहे. यावर्षी गणेश चतुर्थीचे निमित्त साधून शासनाकडून आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या आनंदाच्या शिध्यात एकूण चार वस्तू होत्या. १०० रुपयांत या चारही वस्तू म्हणजे
प्रत्येकी एक किलो चणाडाळ, साखर, रवा व एक लिटर सोयाबिन तेल यांचा समावेश होता. शासनाच्या या उपक्रमाचा लाभ अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही दिला जाणार होता. मात्र, यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील काही लाभार्थी या आनंदाच्या शिध्यापासून वंचित राहिले आहेत. वास्तविक पात्र लाभार्थी संख्येनुसार हा आनंदाचा शिधा उपलब्ध होण्याची गरज होती. मात्र, पुरवठा विभागाने जून महिन्यात जेवढ्या लाभार्थ्यांकडून धान्याची उचल झाली, त्या संख्येनुसार शिध्याची मागणी केल्याने अनेक दुकानदारांना गरजेपेक्षा शिधा कमी पडल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शिल्लक लाभार्थ्यांना पुढील महिन्यात हा आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

