या मुलांच्या मोबाईल चे करायचे काय? कार्यक्रमाला संपन्न
*🛑या मुलांच्या मोबाईल चे करायचे काय? कार्यक्रमाला संपन्न*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* ऑर्कुट, वॉटस् ॲप, फेसबुक, इन्टाग्राम, स्नॅपचॅट आणि तत्सम सोशल मिडिया हे सर्वच काहीना काही विकण्यासाठीच अस्तित्वात आले आहेत. त्यांची रचना व्यावसायिक आहे. मोबाईल सुरु केल्यापासून ते बंद करेपर्यंत विविध माध्यमातून तो पैसा वसूल करतच असतो. मानवाचा वाढता स्क्रीन टाईम आणि इंटरनेट यामुळे त्याचा सामाजिक डिएनए बदलत आहे असे विचार सुप्रसिद्ध सायबर जर्नालिस्ट आणि डिजीटल साक्षरता शिक्षक तथा समुपदेशन मुक्ता चैतन्य यांनी मांडले. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे आयोजीत ‘मुलांच्या मोबाइलचे करायचे काय?, या कार्यक्रमात त्या मार्गदर्शन कार्यक्रमात मांडले. आज २९ सप्टेंबर रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अॅड. देवदत्त परुळेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, खजिनदार शैलेश खांडाळेकर, कार्यकारी सदस्य विकास म्हाडगुत यांची मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात सुरवातीला सूत्रसंचालक प्रा. डॉ. ज्योती तोरसकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण यांच्यावतीने सर्वांचे स्वागत केले. सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांचा परीचय करुन दिला आणि त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. देवदत्त परुळेकर यांनी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, यांच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला आणि उपस्थित मार्गदर्शक मुक्ता चैतन्य यांच्या सामाजिक अभ्यास व कृतीप्रकल्पांची माहिती दिली. सेवांगण परिवार मुक्ता चैतन्य यांच्या कार्यक्रमाच्या द्वारे निरामय व आरोग्यदायी पालकत्व, बालपण व ज्येष्ठत्व या सर्वांसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्य मार्गदर्शन सत्रात मुक्ता चैतन्य म्हणाल्या की आता मोठ्यांचे व लहानांचे जग वेगळे असते या कल्पनेने चालून उपयोग नाही. मोबाइलपासून उद्भवलेल्या समस्यांचे मूळ पालकांच्या अतिरिक्त स्क्रीन टाईममध्येही आहे. शून्य ते २ वयोगटातील शिशू वर्गाला मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप वगैरे कुठलाच स्क्रीन दाखवू नये. २ वर्ष ते १६ वर्ष या टप्प्यात मोठ्यांच्या संपूर्ण देखरेखीखाली मुलांना अर्धातास मोबाईलचा वापर करु द्यावा आणि १६ ते २५ या वयोगटात कामाचे प्राधान्य व डिजिटल विवेकाने हा वापर करावा असेही मुक्ता चैतन्य यांनी सांगितले. मोबाइलच्या वापराने थेट शारिरीक हानी आणि विचारांची जटीलता याबाबत त्यांनी माहिती दिली. ४ वर्षे यानंतर मोबाईल वापरायला संपूर्ण प्रतिबंध शक्य नाही. नो स्क्रीन डे, स्क्रीन टाईम ब्रेक या संकल्पना त्यांनी समजावून सांगितल्या.सोशल साईटस व वॉटस अॅपवरील वरील ऑनलाईन भांडणे आज माणसाचे ऑफलाईन जीवन बिघडवतात त्यामुळे माणुस म्हणूनही सामाजिक ध्रुवीकरण होत आहे. मोबाईल किंवा इंटरनेटचा इतिहास हा फार जुना नाही त्यामुळे याबाबतीतील अजून अधिक वैचारीक, मानसी व शारिरीक हानी यांची तीव्रता कोणालाच तितकिशी माहित नाही. जन्मानंतर हातात फोन आल्यावर जीवन बदलते हे वास्तव आहे परंतु आजही कोणीच मोबाईल व लॅपटॉपसकट जन्माला येत नाही तर माणुस म्हणुनच आपण जन्माला येतो त्यामुळे या समस्यांवर आपण ठरवलं तर आपल्या जीवनाची परिपूर्ण आखणी करुन व त्याची अंमलबजावणी करुन नक्कीच तोडगा काढू शकतो असे त्यांनी आश्वस्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

