कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अधिसूचना जारी

*🛑पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अधिसूचना जारी*

*🛑सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-३०:-* सिंधुदुर्गनगरी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात सिंधुदुर्गातील १९८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाकडून अधिसूचना जारी केली आहे. नागरिकांनी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालयाने ३१ जुलै २०२४ अन्वये मसुदा अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना https://egazette.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे. या अधिसूचनेद्वारे राज्यातील १३ जिल्हे व ५६ तालुक्यांतर्गत २५१५ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. त्यापैकी जिल्हयातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी या पाच तालुक्यांतील १९८ गावांचा समावेश आहे.
आक्षेप ६० दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल, मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडे esz-me@nic.in या इमेल आयडीवर नोंदवावेत. ३१ जुलैला अधिसूचना जारी झाल्यापासून आक्षेप नोंदविण्याचे ६० दिवस ३० सप्टेंबरला संपत असले, तरी याबाबतची प्रसिद्धी उशिराने दिल्याने ३० सप्टेंबरनंतरही आक्षेप नोंदविता येणार आहेत, असे रेड्डी, यांनी स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!