कार्यक्षम शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना मुंबईतून उमेदवारी द्यावी -राजन तेली
*🛑कार्यक्षम शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना मुंबईतून उमेदवारी द्यावी -राजन तेली*
*🛑सरड्या सारखे रंग बदलणाऱ्या केसरकरांना मतदारांनी घरी बसवावे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८:-* सावंतवाडी विधानसभेसाठी भाजपचा उमेदवार द्यावा अशी मागणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून करणार आहे. केसरकर हे मुंबईचे पालकमंत्री आहेत. त्यांना मुंबईत उमेदवारी द्यावी. माझी पार्टी इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार आजवर फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही याची खबरदारी महायुती घेईल असे विधान माजी आमदार राजन तेली यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
केसरकर हे घोषणामंत्री आहेत हे त्यांनी स्वतः सिद्ध केले आहे. ताज हॉटेलच्या शुभारंभाची त्यांनी तीन वेळा घोषणा केली आहे. याबद्दल मुंबईत मंत्रालयात कोणाला माहितीही नाही आहे. एमआयडीसीत उद्योजकाला एक मंत्री स्वतः घेऊन जातो हे दृश्य महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्यकारक आहे. यामागे गौडबंगाल काय आहे? असा सवाल श्री. तेली यांनी केला. पंधरा वर्षात दीपक केसरकर यांनी 50 लोकांना रोजगार देणारा एखादा प्रकल्प आणला का ? हरीत क्षेत्रात लाल श्रेणीतील उद्योग येणार का ? त्यामुळे राजस्थानच्या कंपनीला
जागा दाखवून काय साध्य करणार ? असा सवाल त्यांनी केला.दरम्यान, मल्टीस्पेशालिटी, अॅम्युझमेंट पार्कच भुमिपूजन अशा घोषणा केसरकर यांनी करून सावंतवाडी मतदारसंघाला भकास करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे केसरकर यांना घरी बसवले तरच या मतदारसंघाचा विकास होणार आहे. लोकांचा विश्वास केसरकर यांनी गमावलेला आहे.
केसरकर यांचे सगळे प्रकल्प लोकांची फसवणूक करणारे व
डोळ्यात धूळफेक करणारे आहेत असा आरोप तेली यांनी केला. सावंतवाडीत भाजपचा उमेदवार द्यावा अशी मागणी करणार आहे. माझी पार्टी इथल्या रिपोर्टचा अभ्यास करेल, सीट पडणार असेल तर सर्वेनुसार विचार करेल. इथले आमदार फसवणूक करत आल्याने आपली सिट पडणार नाही याची खबरदारी महायुती घेईल असे मत तेली यांनी व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

