कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

२१ दिवसाच्या गणपतीला मोठ्या भक्तीभावात निरोप

*🛑२१ दिवसाच्या गणपतीला मोठ्या भक्तीभावात निरोप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८:-* २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं वाजत गाजत निरोप देण्यात आला. वारकरी पेहराव, पारंपरिक वाद्य, ढोलताशांचा नाद, मर्दानी खेळ, सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम व आकर्षक देखावे विसर्जन मिरवणूकीत लक्षवेधी ठरले. शेकडो नागरिकांनी हा विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. कोकणातील पहिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा, उभाबाजार गणेशोत्सव मंडळ व वैश्यवाडा गणेशोत्सव मंडळाच्या २१ दिवसांच्या गणरायाला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते‌. गेले २१ दिवस आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरा बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. वारकरी पेहराव, पारंपरिक वाद्य, ढोलताशांचा नाद, मर्दानी खेळ, सामाजिक संदेश देणारे महिलांचे कार्यक्रम, संत तुकाराम व दत्त अवतारासह स्वामी समर्थ, हनुमंताचे आकर्षक देखावे विसर्जन मिरवणूकीत लक्षवेधी ठरले. शेकडो नागरिकांनी हा विसर्जन सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. ढोल पथक, महिलांच्या फुगड्या विशेष ठरल्या‌. रात्री उशिरा मोठ्या भक्तिभावाने गणराला निरोप देण्यात आला. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था केली होती.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!