हातपाय बांधून विवाहितेस बाथरुममध्ये कोंडले.
*🛑हातपाय बांधून विवाहितेस बाथरुममध्ये कोंडले.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२६:-* कौटुंबिक वादातून विवाहितेला चाकूचा धाक दाखवून धमकी देत तिचे हातपाय नायलॉन दोरीने बांधून बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून तिला बंदिस्त केल्याप्रकरणी नाडण वरची पुजारेवाडी येथील अनिल गणपत बाणे (६३) याच्यासह चार महिला संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. बंदिस्त अवस्थेत मोबाईलवरून पीडित विवाहितेने ओरोस पोलीस नियंत्रण कक्षाच्या ‘डायल ११२’ नंबरवर तक्रार दिल्यानंतर देवगड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात तिची सुटका केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता ही मुंबईहून आपल्या माहेरी नाडण वरची पुजारेवाडी येथे आली होती. पीडित विवाहिता ही मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घरानजीक असलेल्या शौचालयाच्या बाहेर आल्यानंतर संशयित अनिल बाणे, स्मिता गणेश घाडी (६०), अमिता अनिल बाणे (६२), दिव्या गणेश घाडी (३२), सुनिता सूर्यकांत बाणे (६४) या सर्वांनी पीडित विवाहितेला चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर तिचे हातपाय नायलॉन दोरीने घट्ट बांधून बाथरुमकडे ओढत नेले. तिला बाथरुममध्ये कोंडून बाहेरून लॉक लावून बंदिस्त केले. या घटनेदरम्यान पीडित विवाहितेकडे मोबाईल होता. तिने पोलीस नियंत्रण कक्षाच्या ‘डायल ११२’ क्रमांकावर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. ओरोस पोलीस नियंत्रण कक्षाकडून तात्काळ देवगड पोलीस स्थानकात घटनेची माहिती देण्यात आली. देवगड पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल नीलेश पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जात पीडित विवाहितेची सुटका केली. फिर्याद पीडित विवाहितेने देवगड पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीनुसार अनिल बाणे, स्मिता घाडी, अमिता बाणे, दिव्या घाडी, सुनीता बाणे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असल्याचे देवगड पोलिसांनी सांगितले. या घटनेचा तपास पोलीस हवालदार अमृता बोराडे करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_