कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

नव्या निर्णयाने डीएड, बीएडधारकांना दिलासा

*🛑नव्या निर्णयाने डीएड, बीएडधारकांना दिलासा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२६:-* स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या – शाळांऐवजी १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर डी. एड., बी. एड. अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नव्या निर्णयात सेवानिवृत्त शिक्षकांना न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेरोजगार डी. एड., बी. एड. उमेदवारांना शाळांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर २० व २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांवर दोन नियमित शिक्षकांपैकी एक शिक्षक कमी होण्याचे संकटही झाले आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण दूर विभागाने ५ सप्टेंबर २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त किंवा डी. एड., बी. एड. अहर्ताधारक बेरोजगार शिक्षक यामधून नियुक्त करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला शाळांवर काम करणाऱ्या नियमित शिक्षकांनी आक्षेप घेतला होता. २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर दोन नियमित शिक्षक असतात. त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक
किंवा डी. एड., बी. एड. बेरोजगार
शिक्षक दिल्यास एक शिक्षक पद कायमस्वरुपी जाण्याची भीती निर्माण झाली होती. त्याचबरोबर डी. एड. बी. एड. बेरोजगार मोठ्या संख्येने असतांना सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्यात येऊन नये, असाही आक्षेप घेण्यात आला होता.
५ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयाला नियमित शिक्षकांनी आक्षेप घेतल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने २३ सप्टेंबर २०२४ अन्वये सुधारित शासन निर्णय काढला आहे. या निर्णयानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांऐवजी १० किंवा १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एक नियमित शिक्षक व एक कंत्राटी डी. एड., बी. एड. बेरोजगारांमधून शिक्षक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे २० व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर नियुक्त असलेले दोन्ही नियमित शिक्षक कायम राहणार आहेत. दरम्यान, शासनाने ५ सप्टेंबरला घेतलेल्या निर्णयानुसार पूर्वीप्रमाणेच डी. एड., बी. एड. बेरोजगारांना नियुक्ती देताना घातलेल्या अटी-शर्ती कायम राहणार असून दरमहा १५ हजार रुपये मानधन, एकूण १२ रजा देय्य राहणार आहेत. शासनाच्या या नव्या निर्णयाचे डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष विजय फाले यांनी स्वागत केले आहे. १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर डी. एड., बी. एड. बेरोजगारांना नियुक्त करण्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!