गणेशोत्सवात देवगड आगाराला १८ लाखाचे उत्पन्न
*🛑गणेशोत्सवात देवगड आगाराला १८ लाखाचे उत्पन्न*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२४:-* गणेशोत्सव काळात देवगड एसटी आगाराने तब्बल १७ लाख ७२ हजार ३१९ रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळविले आहे. देवगड आगाराने चाकरमानी, गणेशभक्तांसाठी येण्याकरिता १७ बसफेऱ्या, तर परतीच्या प्रवासाकरिता ४६ जादा बसफेऱ्यांचे नियोजन करून ५३ हजार ४४७ किलोमीटरच्या प्रवासामधून हे उत्पन्न मिळविले आहे. देवगड आगारातील कार्यरत चालक- वाहकांनी विनाअपघात सुयोग्य सेवा बजावली असून त्यांची ही कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे. गणेशोत्सव काळात देवगड आगाराने मुंबईकर चाकरमानी, गणेशभक्तांसाठी १७ जादा गाड्यांचे नियोजन केले होते. यात डोंबिवलीसाठी १६ व कल्याण-
विठ्ठलवाडीसाठी एक जादा बसफेरीचे नियोजन होते. तसेच परतीच्या प्रवासाकरिता एकूण ४६ जादा बसफेऱ्या देवगडहून बोरीवली, मुंबई सेंट्रल, कुर्ला- नेहरूनगर, विरार, कल्याण- विठ्ठलवाडी, पुणे या मार्गावर रवाना करण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने देवगड- बोरिवली मार्गावर २५ जादा गाड्या, मुंबई सेंट्रलसाठी ८ गाड्या, कुर्ला- नेहरुनगरसाठी ९ गाड्या, विरारसाठी १ गाडी, कल्याण विठ्ठलवाडी २ गाड्या, पुणेसाठी १ गाडी अशा बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. याव्यतिरिक्त देवगड आगाराची नियमित देवगड- बोरिवली व देवगड-नालासोपारा या बसफेऱ्यांमधून प्रवासी वर्गाची सोय करण्यात आली होती.
गणेशोत्सव काळात प्रवाशांना सुयोग्य व सुखकर प्रवास व्हावा,
यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली देवगड आगार व्यवस्थापक विजयकुमार घोलप, स्थानकप्रमुख नीलेश लाड, वाहतूक निरीक्षक श्रीकांत सैतावडेकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गंगाराम गोरे, वाहतूक नियंत्रक तुकाराम देवरुखकर, बी. एस. जाधव, ए. व्ही. कदम, गुरुनाथ हडकर, लक्ष्मण बोगार, दिनेश साळकर, वाहन परीक्षक दिनकर उर्फ अण्णा प्रभूमिराशी, संजय राऊत, संतोष शिंदे यांच्यासह कार्यशाळा अधीक्षक, सर्व कार्यशाळा कर्मचारी, चालक- वाहक या सर्वांनी गणेशोत्सव काळात प्रवासी सेवा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता मोलाची कामगिरी बजावली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

